🕒 1 min read
तुळजापूर: विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करणाऱ्याला केंद्र सरकारने सुरक्षा देण्याची योजना जाहीर केल्याचा टोला लगावला आहे. कंगना रनौत, नवनीत राणा, किरीट सोमय्या हे या योजनेचे लाभार्थी असून ज्या व्यक्तींना संरक्षण हवे आहे त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांवर बोला, टीका करा आणि Y दर्जाची सुरक्षा मिळवा, अशी योजना सुरु असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. त्या तुळजापूर येथे बोलत होत्या.
तसेच विकासाच्या प्रश्नापासून लक्ष विचलित करून समाजात तेढ निर्माण करण्यासाठी मशिदीवरील भोंगे तसेच हनुमान चालीसा पठण हा मुद्दा समोर आणला जात असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. यातून त्यांनी अप्रत्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.
तसेच उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे संभाजीनगर हे नामांतर करण्यासाठी अनेक ठराव शिवसेनेने मांडले. मात्र केंद्र सरकारच्या दुजाभाव आणि दुटप्पी भूमिकेमुळे नामांतर होत नसल्याची टीकाही नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. नामांतर करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 : रक्तातच क्रिकेट..! अर्जुन तेंडुलकरच्या भेदक ‘यॉर्कर’वर इशान किशन क्लीन बोल्ड; पाहा VIDEO!
- IPL 2022 MI vs CSK : मॅचपूर्वी चेन्नईच्या ‘स्टार’ खेळाडूनं सोडलं मैदान; ‘या’ कारणामुळं परतला मायदेशी!
- “… तर त्यांना थोडी सुबुद्धी येईल”, ‘त्या’ वक्तव्यावरून फडणवीसांचा संजय राऊतांना टोला
- IPL 2022 MI vs CSK : आज चाहत्यांची उत्सुकता शिगेला..! दोन संघात कोण आहे वरचढ? नक्की वाचा!
- राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
