Share

काँग्रेसच्या विचाराने हा देश पुन्हा आपल्याला बळकट बनवायचा आहे : बाळासाहेब थोरात

Published On: 

मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे.विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.पुणे शिक्षक आणि औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात देखील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.

या निकालानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या निकालावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, विधानपरिषदेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला खूप मोठं यश मिळालं आहे. मी मित्रपक्षांचे अभिनंदन करतो आणि मतदारांचे आभार मानतो.नागपूरचा जो मतदारसंघ गेली ५५ वर्ष कधीही काँग्रेसला मिळाला नव्हता, जो भाजप – संघाचा बालेकिल्ला समजला जात होता. त्या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार प्रचंड मतांनी विजयी झाला.

थोरात म्हणाले, मित्रपक्षांनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रचंड मेहनतीमुळेच हा आणि इतर विजय आम्ही संपादित कर शकलो. पुढील काळातही महाविकास आघाडी यश मिळवत राहील. कारण या निकालातून खूप मोठे आशीर्वाद जनतेने आम्हाला दिल्याचे मी मानतो. शेतकरी, कामगार हे तर पूर्णपणे भाजपच्या विरोधात गेले आहेत.

थोरात म्हणाले,दिल्लीत होत असलेल्या शेतकरी आंदोलनातून भाजप सरकार विरुद्धचा शेतकरी, कामगारांचा असंतोष बाहेर पडतो आहे.आता सुशिक्षित मतदारही आमच्या मागे ठामपणे उभा राहिलाय. याचा अर्थ असा की भाजपची विचारसरणी आणि कार्यपद्धती त्यांनीही पूर्णपणे नाकारली आहे. काँग्रेसच्या विचाराने हा देश पुन्हा आपल्याला बळकट बनवायचा आहे आणि विधानपरिषदेचा हा निकाल ही त्याचीच सुरवात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!