🕒 1 min read
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं. तर भाजपला केवळ एकच जागा जिंकता आली. दरम्यान, यावरून महाविकास आघाडीनं भाजपवर निशाणा साधला होता. आता या निकालानंतर शिवसेनेनं भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीकेचा बाण सोडला आहे.
चंद्रकांतदादा म्हणतात, आम्ही एकटे लढलो म्हणून हरलो. ते खरे आहे, पण आम्ही सर्वशक्तिमान आहोत व एकटेच लढणार व जिंकणार ही खुमखुमी त्यांचीच होती. ती चांगलीच जिरली आहे. असं म्हणत शिवसेनेनं चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला सणसणीत टोला लगावण्यात आला आहे. एका वर्षात दोनदा सुतक लागणं हे हिंदू शास्त्रानुसार चांगलं नाही. असं अग्रलेखात म्हटलं आहे.
महाविकास आघाडीचे सरकार हे अनैसर्गिक आहे, त्यांना जनतेचा पाठिंबा नाही असे बोलणाऱ्यांनी शिक्षक-पदवीधरांनी दिलेल्या निकालाकडे जाड भिंगाचा चष्मा लावून पाहावे. वर्षभरापूर्वी 105 आमदार येऊनही सत्ता गेली. तेव्हापासून महाराष्ट्र भाजपास सुतक लागले. कालच्या नागपूर-पुण्यातील पराभवाने आणखी एक सुतक लागले.
एका वर्षात दोनदा सुतक लागणे हे हिंदू शास्त्रानुसार चांगले नाही. भाजपला काहीतरी तोड करावीच लागेल असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. तसेच चंद्रकांतदादा म्हणतात, आम्ही एकटे लढलो म्हणून हरलो. ते खरे आहे, पण आम्ही सर्वशक्तिमान आहोत व एकटेच लढणार व जिंकणार ही खुमखुमी त्यांचीच होती. ती चांगलीच जिरली आहे. असं म्हणत भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- तुकाराम मुंढेंना नडणाऱ्या संदीप जोशींचा नागपूरकरांनी केला दारुण पराभव
- आजचा विधानपरिषद निकाल म्हणजे रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवले – अनिल परब
- मोठी बातमी : शेतकऱ्यांची ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक!
- ‘भाजप जनतेचा पक्ष नाही, तो हवेत आला आणि हवेत गेला’
- मुख्यमंत्री आज समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी अमरावती, औरंगाबाद जिल्ह्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

