Share

‘हा विजय महाविकास आघाडीतील सर्वांच्या संघटीत व सुनियोजित प्रयत्नांचा परिणाम आहे’

Published On: 

मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे.विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.पुणे शिक्षक आणि औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात देखील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.

या निकालानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.खासदार अमोल कोल्हे यांनी या निकालावर भाष्य केले आहे. त्यांनी पदवीधर मतदारसंघातून उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल मतदारांचे आभार मानले आहेत तसेच सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन देखील केले आहे.

कोल्हे आपल्या सोशल मिडीयावरील पोस्ट मध्ये म्हणतात, विजयासाठी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. याबद्दल त्यांचे आभार. यासोबतच आदरणीय शरद पवारसाहेब, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जयंतराव पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, बाळासाहेब थोरात जी या सर्वांनी देखील अहोरात्र कष्ट घेतले. हा विजय महाविकास आघाडीतील सर्वांच्या संघटीत व सुनियोजित प्रयत्नांचा परिणाम आहे. या यशाबद्दल या सर्वांचेही हार्दिक अभिनंदन.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!