नाशिक : कर्ज परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी बँकांनी माहितीचे फलक लावून व मेळावे घेवून माहिती द्यावी, जेणेकरून कर्जाची परतफेड करतेवेळी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होईल आणि ते वेळेत कर्जाची परतफेड करू शकतील. तसेच शेतकऱ्यांनी 30 जून पर्यंतकर्ज परतफेड करण्याचे आव्हान नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात पीक कर्ज वाटपाबाबत येणाऱ्या अडचणी व उपाययोजना सुचविणे बाबत बैठकीत घेण्यात आली त्यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे बोलत होते. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले की, वितरण प्रक्रियेतील सर्व अडचणी दूर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याचा प्रयत्न जिल्हा अग्रणी बँक तसेच जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून करण्यात येत आहे. पीक कर्ज वाटप करतांना बँकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या आढावा बैठकीच्या माधमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज लवकर मिळावे. तसेच बँकांना येणाऱ्या अडचणींचेही तात्काळ निरसन केले जात आहे. प्रत्येक पंधरा दिवसांनी सर्व बँकांच्या नोडल अधिकाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर कर्ज वाटपाचे काम वाढविण्या बाबतच्या सूचना देऊन त्यांचा पाठपुरावा ही करण्यात येत आहे. तसेच ग्रामीण भागात वसूली करतांना तुर्तास कोणत्याही प्रकारचा लीलाव बॅंकांनी करू नये अशा सुचनाही यावेळी उपस्थित सर्व बँकांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्जाची थोडीफार थकबाकी रक्कम जमा केली तर ते शेतकरी नवीन कर्ज मिळविण्यास पात्र ठरतील. जे शेतकरी 30 जून पर्यंत नियमीत कर्जाची परतफेड करतील त्यांना शुन्यटक्के व्याजदराने नवीन कर्ज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी बँकेशी तातडीने संपर्क करून थकबाकी जमा करावी असे आवाहनही जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी केले.
तर दुसरीकडे, आपला जिल्हा हा शेतीप्रधान जिल्हा असल्याने कुठलाही गरजू शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याकरिता शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजन करवे, अशा सूचना यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिल्या.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रीय ओबीसी महासंघाची ऑनलाईन बैठक; वर्तमान व ज्वलंत विषयांवर होणार चर्चा
- निलंबनानंतर ओली रॉबिन्सन ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन
- ‘गरजू शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही यासाठी नियोजन करा’
- ‘काही लोकांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी’, अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला
- ‘पवित्र रिश्ता‘ मालिकेमध्ये मानवच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

