कोल्हापूर : केंद्र सरकारकडून राज्याला जीएसटीचे २४ हजार कोटी येणे बाकी आहे. आम्ही सत्तेत आहोत, त्यामुळे आमच्याकडे अधिकृत आकडेवारी आहे. चंद्रकांत पाटील सत्तेत नसल्यामुळे त्यांना जीएसटीची खरी आकडेवारी माहीत नाही. काही लोकांना माहीत नसताना काहीही बोलायची सवय असते. आपल्याकडे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ अशी एक म्हण आहे. काही लोकांची अवस्था अशीच झाली आहे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना लगावला.
कोल्हापूर जिल्हा ‘कोरोना मुक्त’ करण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अशा सूचना देऊन जिल्ह्यात उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक तेवढा निधी राज्य शासन उपलब्ध करुन देईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मक
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. सर्वच घटकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. राज्य सरकार मार्ग काढत आहे. सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाबाबत अहवाल तयार केला जात आहे. केंद्र सरकारने पुढाकार घेऊन मराठा आरक्षणावर तोडगा काढला पाहिजे, असेही पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झाडाझडती, दोन अधिकाऱ्यांसह पाच पोलीस निलंबित
- WTC चा अंतिम सामना जिंकणाऱ्या टीमला मिळणार ‘एवढी’ रक्कम
- ‘या’ ठिकाणी दुसऱ्यांदा अतिक्रमणाचा प्रयत्न, मनपाच्या अतिक्रमण विभागाने हाणून पाडला!
- इशांत का सिराज, ‘विराट’प्रश्न ; सराव सामन्यात मिळालं उत्तर
- ‘धर्माच्या भावनांशी खेळू नका’; राम मंदिर घोटाळ्याच्या आरोपांवर शिवसेना खासदाराचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

