Share

निलंबनानंतर ओली रॉबिन्सन ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन

Published On: 

इंग्लंड : इंग्लंड विरुद्ध न्युझीलंड या दोन संघातील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राखण्यास इंग्लंडला यश आले. मात्र या सामन्यात पदार्पण करणारा इंग्लंडचा गोलंदाज ओली रॉबिन्सनला चांगली कामगिरी करुनही निलंबन करण्यात आले होते. कारण २०१२-१३ साली रॉबिन्सनने काही अक्षेपार्ह ट्विट केले होते.

आठ वर्षापुर्वी ओली रॉबिन्सनने सोशल मीडीयीवर लैंगिकता आणि वर्णद्वेषाबद्दल टिप्पणी केली होती. पहिल्या सामन्यादरम्यान ती समोर आली त्यामुळे ईसिबीने त्या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्याला निलंबीत केले होते. निलंबनाच्या करवाईनंतर गेल्या आठवड्यात रॉबिन्सनने क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, ऑली रॉबिनसन आता हँपशायरविरुद्ध टी-20 सामन्यात ससेक्सच्या दुसर्‍या संघाकडून खेळण्यासाठी क्रिकेटच्या मैदानावर परतणार असल्याची माहिती काऊंटी संघाने सोमवारी दिली. ससेक्स यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले की, “हेन्री क्रोकोम्बे दुसर्‍या संघात ओली रॉबिन्सनबरोबर सामील होईल. गेल्या आठवड्यात थोड्या विश्रांतीनंतर ओली क्रिकेटमध्ये परतला.”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!