Share

‘गरजू शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही यासाठी नियोजन करा’

Published On: 

नाशिक : आपला जिल्हा हा शेतीप्रधान जिल्हा असल्याने कुठलाही गरजू शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याकरिता शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजन करवे, अशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात पीक कर्ज वाटपाबाबत येणाऱ्या अडचणी व उपाययोजना सुचविणे बाबत घेण्यात आलेल्या बैठकीत उपाध्यक्ष झिरवाळ बोलत होते. यावेळी आमदार दिलीप बनकर, नितीन पवार, दिलीप बोरसे, हिरामण खोसकर, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अर्धेंद्रु शेखर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक मोहमद आरीफ यांच्यासह सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे समन्वयक उपस्थित होते.

विधनसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले की, नवीन शासन निर्णयानुसार लक्षांकानुसार जिल्हा मध्यवर्ती बँक व इतर राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज वाटप करावे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शुन्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच जिल्ह्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, तसेच या भागात काम करतांना सर्व बँकांनी संवेदनशिलता बाळगावी. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनीही हातभार लावावा. तसेच या योजनेंतर्गत येणारा निधी बँकांनी वसुलीपोटी जमा करू नये, अशा सूचनाही उपाध्यक्ष श्री.झिरवाळ यांनी यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व संबंधित बँकांना केल्या आहेत.

सन 2020-2021 हंगामाकरीता पीक कर्ज वाटप करण्यासाठी राष्ट्रीयकृत बॅंकांनी तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लक्षांकानुसार जास्तीत जास्त पिक कर्ज पुरवठा शेतकऱ्यांना करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे. या सर्व बँकांनी कर्ज पुरवठा करतांना आणि कर्जाची वसूली करतांना नियोजन करून आराखडा तयार करावा व त्यानुसार त्याची अंमलबजावणी करावी. कर्जफेड करण्याबाबत असणाऱ्या नियमांची स्थानिक भाषेत जनजागृती केल्यास त्याचा अधिक सकारात्मक परिणाम दिसून येईल असेही उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!