Share

राष्ट्रीय ओबीसी महासंघाची ऑनलाईन बैठक; वर्तमान व ज्वलंत विषयांवर होणार चर्चा

Published On: 

बीड: ओबीसी समाजाच्या वर्तमान व ज्वलंत विषयांवर ऑनलाईन बैठकीमध्ये चर्चा होणार आहे, ही बैठक मंगळवारी दि. १५ जून रोजी संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत होणार आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची झुम मीटींग राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली आहे.

या बैठकीत ओबीसींच्या वर्तमान व ज्वलंत अशा विविध विषयांवर चर्चा करुन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करणे, ४ मार्च २०२१ ला सुप्रीम कोर्टाच्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या निर्णयावर विचार विनिमय करणे, क्रिमीलयेरची मर्यादा मागील चार वर्षांपासून न वाढल्याने येणाऱ्या अडचणी, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मध्ये आरक्षण मिळण्याबाबत, आठ जिल्ह्यातील कमी झालेले आरक्षण, ऑल इंडिया मेडिकल कोटा मध्ये ओबीसींच्या कमी झालेल्या जागा, ओबीसींचा बॅक लॉक त्वरित भरण्यात यावा, रोहिणी आयोग रद्द करून नवीन आयोग तयार करावा, आदी विषयांवर चर्चा होणार आहे.

या ऑनलाईन झुम मीटींग मधे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महासचिव सचिन राजुरकर व इतर पदाढीकऱ्यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशभरातील ओबीसी समाजांतर्गत येणाऱ्या कुटूंबातील युवक-युवतींच्या भविष्यासाठी, हक्कासाठी मागील अनेक वर्षांपासून शासन व सरकार पातळीवर लढा सुरू आहे. १५ जून २०२१ रोज मंगळवारला वेळ सायं. ६ ते ९ वाजेपर्यंत ऑनलाइन झूम मीटिंग होणार असून यात डॉ. बबनराव तायवाडे, डॉ. अशोक जिवतोडे यांचे मार्गदर्शन करणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!