मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेली ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अल्पावधीतच ही या मालिकेने लोकांच्या मनात जागा निर्माण केली होती. विशेष म्हणजे या मलिकेतील अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत यांनी कलेली अर्चना-मानवची जोडी चांगलीच चर्चत होती. या दोघांना या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळाली होती.
सुशांत सिंग राजपूतने २००९ ते २०११ सालापर्यंत पवित्र रिश्ता मालिकेत काम केले होते. त्यानंतर अभिनेता हितेन तेजवानी मानवच्या भूमिकेत झळकू लागला. आता या मालिकेता दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने आता यावेळी मानवच्या भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार याची चर्चा सुरु झाली होती. मात्र आता या भूमिकेसाठी एका उत्तम अभिनेत्याची निवड करण्यात आली आहे.
https://www.instagram.com/p/CLEOk8hMvSu/?utm_source=ig_web_copy_link
सुशांतच्या मृत्युनंतर आता पुन्हा एकदा पवित्र रिश्ता मालिकेचा दुसरा भाग डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पवित्र रिश्ता सीक्वल मालिकेत अर्चना देशमुखच्या भूमिकेत पुन्हा एकदा अंकिता लोखंडे दिसणार आहे. तर सुशांतसिंग राजपूतने साकारलेल्या मानवची भूमिका कोण साकरणार यावर मात्र प्रश्न चिन्ह आहे. अखेर आता अर्चनाच्या नव्या मानवचं नाव समोर आलं आहे. अभिनेता शाहीर शेख मानवची भूमिका साकारणार असून ७ वर्षांनंतर अंकिता लोखंडे पुन्हा अर्चनाच्या भूमिकेत झळकणार आहे.
अभिनेता शाहीर शेखने ‘नव्या’ या मालिकेत साकारलेली अनंत ही भूमिका तसंच महाभारत या मालिकेतील त्याच्या अर्जुनच्या भूमिकेला चाहत्यांनी मोठी पसंती दिली होती. त्याचसोबत ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेच्या तीनही सिझनमधून शाहीरने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मात्र अद्याप एकता कपूर आणि अंकिता लोखंडे यांच्याकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. या मालिकेतील मानवची ही भूमिका लोकांच्या भावनेशी जोडणारी असणार आहे. त्यामुळे पवित्र रिश्ताचा नवीन भाग पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- WTC चा अंतिम सामना जिंकणाऱ्या टीमला मिळणार ‘एवढी’ रक्कम
- ‘या’ ठिकाणी दुसऱ्यांदा अतिक्रमणाचा प्रयत्न, मनपाच्या अतिक्रमण विभागाने हाणून पाडला!
- इशांत का सिराज, ‘विराट’प्रश्न ; सराव सामन्यात मिळालं उत्तर
- ‘धर्माच्या भावनांशी खेळू नका’; राम मंदिर घोटाळ्याच्या आरोपांवर शिवसेना खासदाराचा इशारा
- ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप करा, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे निर्देश!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

