बीड : राज्यातील मंदिरे बंद असल्याने मंदिर परिसरातील व्यापारी, छोटे उद्योजक, फुल व्यावसायिक, पुजारी इत्यादींवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सर्व स्तरांमधून मंदिरे उघडावीत अशी करुणामय मागणी राज्य सरकारकडे होत आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकार यावर कोणताही निर्णय घेत नाहीये.
त्यामुळे राज्य सरकारचे निर्बंध आता आम्ही पाळणार नाहीत तुम्ही बिअरबार, हॉटेल, मॉल, सुरू केले. मग मंदिरे बंद का ? असा सवाल करत जिल्ह्यात चौथा श्रावण सोमवार व श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधत भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. बीड जिल्ह्यातील परळीच्या वैद्यनाथासह राज्यातील सर्वच मंदिरे उघडावी, यासाठी प्रभू वैद्यनाथाच्या उत्तर घाटावरील पायऱ्यांवर घंटानाद आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आले. सोमवारी सकाळी ११ वाजता शहरातील वैद्यनाथ मंदिर परिसरात घंटानाद आंदोलन करण्यात आले.
मात्र, त्याच दिवशी म्हणजे सोमवारी सायंकाळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी वैद्यनाथाच्या पायऱ्यांवर आपला माथा टेकवत प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतले. ‘मनात श्रद्धा व भाव असल्यास ईश्वराचे दर्शन दारातूनही घेता येते’ असे म्हणत त्यांनी भाजपच्या आंदोलनाला एक प्रकार अप्रत्यक्ष टोला लगावल्याचे दिसून येत आहे.
श्रावण सोमवारनिमित्त आज बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या आमच्या परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने पायरीचे दर्शन घेतले. मनात श्रद्धा व भाव असल्यास ईश्वराचे दर्शन दारातूनही घेता येते, येथे भक्ती सिद्ध करण्यासाठी कोणताही हट्ट तोकडा ठरतो! pic.twitter.com/UOVxyv7sM1
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 30, 2021
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओसोबत धनंजय मुंडे म्हणतात की, ‘श्रावण सोमवारनिमित्त आज बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या आमच्या परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने पायरीचे दर्शन घेतले. मनात श्रद्धा व भाव असल्यास ईश्वराचे दर्शन दारातूनही घेता येते, येथे भक्ती सिद्ध करण्यासाठी कोणताही हट्ट तोकडा ठरतो!’.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अण्णा हजारे इतके दिवस कुठे होते?’, मंदिराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा सवाल
- ‘नाक्यावर संजय राऊत सारखे माणसे पैसे देऊन विकत घेता येतात’, नितेश राणेंचा टोला
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- ‘मंदिरे उघडलीच पाहिजे अन्यथा..’, राज ठाकरेंचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

