मुंबई : महेश बाबू यांच्या मेजर या अॅक्शन ड्रामा चित्रपटाच्या ट्रेलर लाँच नुकतच पार पडलं. यावेळी महेश बाबूने मीडियाशी संवाद साधला होता. तो म्हणाला होता की, “मी बॉलिवूड ला परवडणार नाही. बॉलिवूड म्हणजे वेळ वाया घालवणे आहे.” बॉलिवूड ची खिल्ली देखील त्याने उडवली होती. आता अवघ्या २४ तासातच त्याने केलेल्या आपल्या विधानावरून यू टर्न घेतला आहे.
महेश बाबूच्या जवळच्या सूत्राकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात महेश बाबू म्हणतो आहे की, “मी सर्व भाषांचा आदर करतो आणि सिनेमावर माझं प्रेम आहे. मी बॉलिवूडवर केलेली टिप्पणी हा केवळ एक मजाक होता. तो केवळ विनोद म्हणून घेतला पाहिजे.
पॅन इंडिया चित्रपटात काम करण्यास तयार आहे महेश बाबू –
एक आश्चर्य कारक गोष्ट म्हणजे, महेश बाबू, ‘बाहुबली’ आणि ‘RRR’ चित्रपट निर्माते एस. एस. राजामौलीसोबत संपूर्ण भारतासाठी चित्रपट करण्यासाठी सज्ज आहे. महेश बाबूचा आगामी चित्रपट सरकारु वारी पटा हा १२ मार्च २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
जाणून घ्या संपूर्ण प्रकरण –
महेश बाबू म्हणाले होते कि, मला हिंदी मध्ये खूप विचारणा झाली, पण त्यांना तमी परवडत नाही. मला माझा वेळ वाया घालवायचा नाही. मला दक्षिणमध्ये मिळालेला आदर खूप मोठा आहे. त्यामुळे मी माझे उद्योग सोडून दुसऱ्या उद्योगामध्ये जाण्याचा विचार ही केला नव्हता. मी कायम चित्रपट करण्याचा विचार केला आहे. माझे स्वप्न आता पूर्ण देखील होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

