जम्मू काश्मीर : ताजमहालामध्ये खरंच शिवमंदिर आहे का हे तपासण्यासाठी २० खोल्या उघडण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी काही दिवसांपूर्वी लाखनऊ खंडपीठात दाखल झालेल्या एका याचिकेच करण्यात आली. या याचिकेवरून मेहबूबा मुफ्ती यांनी भाजपला जाहीर आव्हान केले आहे.
“तुमच्यामध्ये दम असेल तर ताजमहाल आणि लाल किल्याला मंदिर बनवून दाखवा,” असे थेट आवाहन जम्मू – काश्मीर च्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी भाजपला केले. मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, भाजप महागाई कमी करू शकत नाही, लोकांना रोजगार मिळवून देऊ शकत नाही. हे खूप मोठ दुदैव आहे.
आपलं देश कित्येक देशांच्या मागे आहे. देशाची संपत्ती विकली जात आहे. पण या लोकांना याची चिंता नाही, अशी टीका मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे. दरम्यान याचिककर्त्यांनी ताजमहालामध्ये भारतीय शिलालेख आहेत का? ताजमहालात जुन्या मुर्त्या आहेत का? आणि तिथे खरच शिवमंदिर आहे का? या सर्व गोष्टी तपासण्यासाठी ताजमहालामधील २० बंद असलेल्या खोल्या उघडण्यास परवनगी मागितली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

