पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जून ला आपल्या सहकाऱ्यांसोबत अयोध्याला जाणार अशी मोठी घोषणा केली आहे. हिंदू बांधवांनी तयारीत राहावं असे आवाहनही राज ठाकरेंनी केले आहे. या अयोध्या दौऱ्याला उत्तरप्रदेशातूनही कडाडून विरोध होत आहे. राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. त्यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला असता त्यांनी खोचक टोला लगावला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ”भारत हा सुंदर देश आहे. माझी सर्वच भारतीयांना विनंती आहे, कश्मीर ते कन्याकुमारी सगळ्यांनीच भारत दर्शन करावे. पंडित जवाहरलाल नेहरुंनी भारत एक खोज हे अप्रतिम पुस्तक लिहलं आहे, मी ते पुस्तक वाचलंय आणि देशही फिरले आहे. तसंच, सगळे करत असतील तर ते देशासाठी चांगलंच आहे”.
राज ठाकरेंचा दौरा –
५ जून ला आपल्या सहकाऱ्यांसोबत अयोध्याला जाणार अशी मोठी घोषणा राज ठाकरे यांनी केली. हिंदू बांधवांनी तयारीत राहावं असे राज ठाकरेंनी आवाहन केले आहे. भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना अपमानित केल्याबद्दल माफी मागावी, अशी भूमिका ब्रिजभूषण शरण सिंह यांनी घेतली आहे. त्यांनतर त्यांनी फेसबुक पोस्ट करत कडाडून विरोधही केला. राज ठाकरेंच्या दौऱ्याचा विरोध करण्यासाठी ५ जूनला चलो अयोध्या महाअभियान आयोजित करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा पार पडेल की दौऱ्यात काही अडचणी निर्माण होतील? हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या –


