Share

Asia Cup 2022 : श्रीलंकेतील हिंसाचारामुळे एशिया कप २०२२चे आयोजन संकटात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: एशिया कप २०२२ (Asia Cup 2022) चे आयोजन यावर्षी ऑगस्ट सप्टेंबरला श्रीलंकामध्ये केले जाणार आहे. यावेळेस एशिया क्रिकेट परिषदेने (ACC) श्रीलंकेकडे यजमानपद सोपवले होते. वेळापत्रकानुसार स्पर्धा २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. परंतु श्रीलंकामध्ये प्रचंड हिंसाचारामुळे आशिया कप २०२२ (Asia Cup 2022) धोक्यात आले आहे. महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतरही लोकांचा रोष कमी झालेला नाही. देशभरात प्रचंड हिंसाचार सुरू असताना राजपक्षे यांच्या घराला निदर्शकांनी आग लावली आहे. त्यामळे एशिया कपचे यजमानपद श्रीलंकेकडून हिसकावले जाऊ शकते. ही स्पर्धा टी-२० प्रकारामध्ये खेळवली जाणार आहे, कारण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी तयारी करण्याची संधी मिळणार आहे.

श्रीलंकेतील अशी परिस्थिती पाहता या देशात आशिया कप २०२२ चे आयोजन धोक्यात येऊ शकते. इतकंच नाही तर ऑस्ट्रेलियाला जून-जुलैमध्ये ३ टी-२०, ५ एकदिवसीय आणि २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करायचा आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेच्या मालिकेवर धोक्याची घंटा वाजत आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिया चषक २०२२ श्रीलंकेत आयोजित न झाल्यास यजमानपद दुबईकडे सोपवण्याबाबत चर्चा होऊ शकते. ९ मे रोजी आंदोलकांनी श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे घर जाळले होते.

एशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी अलीकडेच सांगितले की, आशिया चषक २०२२ च्या आयोजनाबाबत कोणताही निर्णय आयपीएल २०२२ नंतर घेतला जाईल. आशिया चषकाचे ७ वेळा विजेतेपद पटकावल्यानंतर टीम इंडियाच्या नजरा ८व्या विजेतेपदावर असतील. टीम इंडियाने २०१६ आणि २०१८ मध्ये सलग दोन आशिया चषक जिंकले आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!