Share

महाराष्ट्राची हास्यदिंडी थेट पोहोचली पारनेर नगरीतील कोविड सेंटरमध्ये

Published On: 

सिल्लोड : सिल्लोड येथील प्रसिद्ध भारूडकार शरद काकडे निर्मित महाराष्ट्राची हास्यदिंडी या लोकप्रिय कार्यक्रमाने कोरोना रुग्णांची लोककलारूपी सेवा करत महाराष्ट्र हास्यदिंडीची पताका थेट पारनेर नगरीत फडकावली. निलेश लंके प्रतिष्ठानद्वारे कोरोना रुग्णांसाठी पारनेर येथे शरद पवार आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. येथील रुग्णांसाठी नुकतेच मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कवी कृष्णा जैवाळ यांच्या लेखणीतून साकार झालेल्या ‘आरोग्य मंदिरात पुजारी पाहिला’ या गीताने व भारूडकार शरद काकडे यांच्या प्रभावी गायनाने कोरोना रुग्णांना देखील ठेका धरायला भाग पाडले.

कोरोनाच्या धास्तीनेच मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अशा रुग्णांना धीर देण्यासाठी, व मानसिक दृष्ट्या खंबीर राहण्यासाठी पारनेर येथील या कोविड सेंटर मध्ये मागील दोन महिन्यांपासून विविध लोकप्रिय कार्यक्रमांचे आयोजन सुरु आहे. याच दृष्टीकोनातून सिल्लोड येथील प्रसिद्ध भारुडकार शरद काकडे निर्मित महाराष्ट्रांची हास्यदिंडी या लोककला संचाने लोककलेच्या माध्यमातून कोरोना रुग्णांमध्ये आत्मविश्वास व ऊर्जा निर्माण करत प्रभावी लोककलेचे दर्शन घडविले. गौळण, बतावणी, भारूड, गोंधळ, लोकगीते, पोवाडा आदी कलाप्रकार सादर करण्यात आले. या कार्यक्रमासाठी स्वतः आ. निलेश लंके यांनी हजेरी लावत संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेतला.

या कार्यक्रमासाठी प्रा.रुपेश ठाकूर, प्रा.रमेश धोंडगे, सोमीनाथ भालेराव, युवा कीर्तनकार संदीप काकडे, राहुल बिरारे, जेष्ठ भारूडकार एकनाथ काकडे, भीमराव जैवाळ आदी कलावंत सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी पारनेर येथील निलेश लंके प्रतिष्ठाणचे पदाधिकारी राहुल झावरे आदींनी विशेष परिश्रम घेतले. भारूडकार शरद काकडे यांच्या लेखणी व दिग्दर्शनातून साकार झालेल्या पोतराजने कोरोनाच्या संकटात उपाय असलेल्या कोरोना लसीची जनजागृती केली. ‘विणवून सांगतं महाराष्ट्र शासन; कोरोनाची लस घ्यावी टोचून’ अशी साद घालत प्रत्येकाने आपले व आपल्या कुटुंबाचे लसीकरण करून घ्यावे असे उपस्थितांना आवाहन केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!