Share

‘जनता ठरवेल शिवसेनेनं काम किती केलं आणि वसुली किती केली ते’

Published On: 

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावरून आता भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. महापालिकेच्या निवडणुका दोन वर्षासाठी पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव आहे. शिवसेनेचा हा डाव आम्ही हाणून पाडू, असा इशारा भाजप नेते व आमदार ऍड. आशिष शेलार यांनी दिला आहे.

भाजपच्या या आरोपांवर आता शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना कामाच्या बळावर निवडणुका लढवते आणि जिंकते. गटनेत्यापासून नेत्यापर्यंत सर्वजण रस्त्यावर उतरून जनतेची कामे करतात. त्यामुळे कधीही निवडणुका घ्या, शिवसेना घाबरत नाही. कोरोना काळात देखील शिवसेनेनं मुंबईत चांगलं काम केलंय. त्यामुळे निवडणूक हरण्याचा प्रश्नच नाही, असे चोख प्रत्युत्तर मुंबईच्या महापौर व शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिले.

आता, पेडणेकरांच्या या दाव्याचा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी समाचार घेतला आहे. ‘जनतेला ठरवू देत ताई…तुम्ही काम किती केलं आणि वसुली किती केली ते. मुंबईची तुंबई झाली की तुमचं पितळ उघडे पडेलच.कोरोना काळातले मृत्यूदेखील जनता विसरलेली नाही,’ असा घणाघात अतुल भातखळकर यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!