औरंगाबाद : खेडोपाड्यात वाढणारा कोरोना रुग्णांचा आकडा आता घसरणीकडे लागला असून आता पॉझिटिव्ह रुग्णांची दैनंदिन संख्या शंभरीच्या आत आली आहे. मंगळवार, ०१ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात केवळ ९० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने ग्रामीण आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.
गेल्या महिनाभरापासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या जितकी झपाट्याने कमी झाली तितकीच झपाट्याने ग्रामीण भागात वाढ होत होती. मे च्या मध्यन्तरी हा आकडा २५०च्याही वर गेला होता. यामुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली होती. दरम्यान, जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेने युद्धपातळीवर उपाययोजना राबविल्या. परिणामी पॉझिटिव्ह रुग्णसंख्या उतरणीला लागली असून मंगळवार, १ ऑगस्ट रोजी हा आकडा शंभरीच्या आता आला आहे. तसेच मृत्यूसंख्यादेखील आटोक्यात आली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेने सुस्कारा सोडला आहे. मात्र अद्याप धोका टळलेला नाही.
मंगळवार रोजी जिल्ह्यात केवळ ९० पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात सर्वाधिक २९ रुग्ण कन्नड तालुक्यात सापडले आहेत. तर फुलंब्री आणि खुलताबाद तालुक्यात सर्वात कमी ३ रुग्ण सापडले आहेत. याशिवाय सोयगाव तालुक्यात ही संख्या शून्यावर आली आहे.
याखेरीज जिल्ह्यातील मृत्युसंख्यादेखील आटोक्यात आली आहे. मंगळवार १ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात केवळ ४ मृत्यू झाल्या. मे च्या शेवटच्या आठवड्यात हा आकडा १६ पर्यंत पोहोचला होता.
सध्यस्थिती जिल्ह्यात ५६ हजार ७२४ पॉझिटिव्ह रुग्ण झाले असून, उपचारांती ५२ हजार ८५८ रुग्ण घरी परतले आहेत. आजघडीला एकूण २५०५ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १३६१ रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- विराट सोबत अनुष्का-वामिका जाणार इंग्लंड दौऱ्यावर ?
- …तर अंतिम सामन्यात रोहित शर्माचं दुहेरी शतक समजा ; पाकिस्तानच्या दिग्गजाची भविष्यवाणी
- दिलासादायक! राज्यात आज ३५,९४९ कोरोना रुग्ण बरे होऊन परतले घरी
- रस्ता रूंदीकरण प्रश्नी आ. सतीश चव्हाण यांनी घेतली अशोक चव्हाणांची भेट!
- ‘मोदींमुळे भाजप तर बाळासाहेबांमुळे शिवसेना सत्तेत’ -राज ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

