पैठण : लॉकडाउन, कोरोनाचा भयंकर प्रकोप सुरू असताना राज्यातील ८६००० कंत्राटी कामगार २४ तास अविरत वीज निर्मिती, वहन व वितरणाचे काम करत होते. वीजपुरवठा अविरत सुरू ठेवल्यामुळे दवाखाने, कोविड हॉस्पिटल, पाणीपुरवठा इत्यादी ठिकाणी वीजपुरवठा सुरू आहे. कंत्राटी कामगारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन शासनाप्रमाणे सुविधा देण्यात याव्या, फ्रंटलाईन वर्कर समजून वीज कामगार कंत्राटी कामगार यांचे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे प्रथम लसीकरण करावे कोविडमुळे मृत्यू पावलेल्या वीज कामगारांना ५० लाख अनुदान द्यावे इत्यादी मागण्या आ. संदिपान भुमरे यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.
या निवेदनात म्हटले आहे, मागील वर्षी झालेल्या फयान चक्रीवादळ व या वर्षी झालेले तोक्ते चक्रीवादळ कोल्हापूर, सांगली, पंढरपूर मध्ये आलेला महापूर तसेच मुंबईतील तांत्रिक कारणाने वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर विक्रमी वेळेत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम विज कामगार व अधिकारी यांनी केले. अत्यंत महत्त्वाच्या वीज उद्योगात काम करणाऱ्या वीज कामगार तसेच कंत्राटी कामगार यांना गेल्या वर्षभर फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन शासनाप्रमाणे सुविधा देण्यात याव्यात, फ्रंटलाईन वर्कर समजून विज कामगार कंत्राटी कामगार यांचे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे प्रथम लसीकरण करावे, कोविडमुळे मृत्यू पावलेल्या वीज कामगारांना महाराष्ट्र शासनाप्रमाणे ५० लाख अनुदान द्यावे. इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत.
या मागण्यांसाठी २४ मे २०२१ पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु करण्यात आले आहे. दरम्यान कोणत्याही ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होणार नाही झाला तरी तात्काळ दुरुस्त करण्यात येईल ही दक्षता घेऊन महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी यांच्या कृती समितीच्या संघटनांतर्फे या कामबंद आंदोलनाचा कामगार संघटना व ऊर्जामंत्री यांच्यामध्ये चर्चेसाठी बैठक लावण्याबाबत मध्यस्थी करण्यासाठी सहा संघटनांच्या कृती समिती पैठण यांच्या संदीपान भूमरे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री यांना सोमवारी निवेदन देण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- संजय राऊतांच ‘ते’ आमंत्रण आम्ही स्वीकारतो; आशिष शेलारांच्या विधानाने उत्सुकता वाढली
- ऱ्हदयद्रावक! मायलेकीसह पुतणीचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू
- अजब ! 5G याचिकेवरील सुनावणीवेळी जुही चावला लागल्या गाणी गायला, कामकाजात आणले व्यत्यय
- एकच धून…६ जून ! शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य होण्यासाठी संभाजीराजेंनी जाहीर केली लिंक
- ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतले ‘हे’ तीन मोठे निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

