Share

आयुर्वेदाच्या मदतीने ६०० कोरोना रुग्ण झाले ठणठणीत बरे ; AIIA ने दिली माहिती

Published On: 

नवी दिल्ली : योग गुरू रामदेवबाबा यांनी अॅलिओपॅथीबाबत केलेल्या वक्तव्यावरून सध्या भारतात अॅलिओपॅथी विरुद्ध आयुर्वेद असा सुरू झालेला वाद ताजा असतानाच आता एक मोठी माहिती समोर आली आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदामध्ये शेकडो कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत.

कोरोना रुग्णांवर सध्या वेगवेगळ्या औषधांनी आणि वेगवेगळ्या पद्धतीने उपचार देण्याचा प्रयत्न सुरू आहेत. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदाने (AIIA) आपण कमीत कमी 600 कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार केले, असं सांगितलं आहे. आयुर्वेद, अ‍ॅलोपॅथी आणि आधुनिक निदान तंत्रज्ञान याच्या एकत्रिकरणामुळे हे शक्य झालं आहे, असं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदाच्या संचालकांनी सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वी बाबा रामदेव यांनी देखील आयुर्वेदाने कोरोना रुग्ण बरं केल्याचा दावा केला होता. कोरोनातून देशाला वाचवण्यात डॉक्टरांचं मोठं काम आहे, हे मी मान्य केलं आहे, पण तसं असलं तरी 90 टक्के रुग्ण बरे करणाऱ्या आयुर्वेदाला कमी लेखण्याचं काम करू नये असं बाबा रामदेव म्हणाले. बाबा रामदेव यांनी 90 टक्के कोरोना रुग्ण योग आयुर्वेदाच्या मदतीने ठीक झाल्याचा दावा केला होता. 90 टक्के रुग्ण प्राणायाम करून बरे झाल्याचा पुनरुच्चान त्यांनी केला होता.

परंतु या दाव्यानंतर कोरोना रुग्णांची जबाबदारी बाबा रामदेव यांनी घ्यावी असं आव्हान आयएमएनं दिलं होतं. त्यावर व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवरील रुग्णांना डॉक्टरांनी सांभाळावं इतर सर्वांच्या उपचाराची मी जबाबदारी घेतो असा दावा रामदेव बाबांनी केला असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!