Share

काळजी घ्या, बेफिकिरी नको ! पुण्यात नव्या कोरोना रुग्णांमध्ये किंचित वाढ

Published On: 

पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान, पुणे शहरात एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सात हजार रुग्णांची वाढ होत होती. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यासाठी देखील ही बाब गंभीर होती. मात्र, आता कोरोना रुग्णांच्या आकड्यात मोठी घट होत असून कोरोना बाधितांची संख्या देखील अधिक आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये नव्या कोरोना रुग्णांचा आकडा हा १ हजारांच्या खाली आहे. दरम्यान, २ दिवसांपूर्वी पुण्यात दुसऱ्या लाटेतील नीचांकी नवे कोरोना बाधितांची संख्या नोंदवण्यात आली होती. केवळ १८० रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मात्र, आता हा आकडा पुन्हा एकदा वाढत आहे. आज ४६७ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे.

त्यामुळे निर्बंधांमध्ये काहीशी शिथिलता मिळाली असली कोरोना रोगाला पूर्णपणे हरवण्यासाठी बेफिकिरी न करता आवश्यक काळजी व भान ठेवणे गरजेचे आहे. दरम्यान, आज ६५१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यामुळे आता ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ हजार ३०५ इतकी झाली असून ७६१ रुग्ण हे गंभीर आहेत. सध्या १ हजार ४२१ रुग्ण हे ऑक्सिजनच्या साहाय्याने उपचार घेत आहेत. तर, आज कोरोनामुळे २९ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!