Share

राज ठाकरेंनी केले ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचे कौतुक, दिग्दर्शक प्रवीण तरडेंसोबत मारल्या गप्पा

Published On: 

मुंबई :  अभिनेते प्रवीण तरडे यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कथा प्रेक्षकांना पहायला मिळत आहे. या चित्रपटाचे सगळीकडे कौतुक केले जात आहे.

नुकतीच प्रवीण तरडेंची एक मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीमध्ये त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, जेव्हा तुम्ही राज ठाकरेंची भेट घेतली त्यावेळी महाराष्ट्राच्या आणि भारतीय चित्रपटाविषय काय चर्चा झाली? यावर उत्तर देत प्रवीण तरडे म्हणाले, “आम्ही दीड-दोन तास गप्पा मारत होतो आणि राज साहेब फक्त चित्रपटांविषयी बोलत होते. मराठी चित्रपट त्याची पुढची वाटचाल, टेक्नॉलॉजी, व्हिएफेक्स, भाषेचे अडथळे, सबटायटल्स यात मराठी चित्रपट कसा टिकणार?”

पुढे प्रवीण तरडे म्हणाले, “राज ठाकरे साहेब रोज एक चित्रपट पाहून झोपतात. त्यामुळे राज ठाकरे साहेबांच्या बोलण्यात चित्रपटाचे कॅमेरा अॅंगल, लेनसेल अॅक्सेस यावर बोलत होते. यावेळी ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाबद्दल देखील चर्चा झाली. त्यांनी या चित्रपटाचे कौतुक देखील केले आणि म्हणाले, मराठी चित्रपट जर दर्जाला येत असेल तर त्याचे भविष्य आणि वाटचाल खूप चांगली आहे.”

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!