🕒 1 min read
मुंबई : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ कोलंबो येथे पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ यजमान श्रीलंकेविरुध्द मर्यादित षटकांसह कसोटी मालिका खेळणार आहे. गेल्या सहा वर्षांतील ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच श्रीलंका दौरा आहे. मर्यादित षटकांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व अॅरॉन फिंचकडे असेल, तर कसोटी मालिकेसाठी कर्णधारपद पॅट कमिन्सच्या खांद्यावर असणार आहे.
या दौऱ्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ २ कसोटी, ५ एकदिवसीय आणि ३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी श्रीलंका येथे पोहोचला आहे. नव्याने नियुक्त झालेले ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड संघासोबत गेलेले नाहीत. मॅकडोनाल्ड यांना सध्या कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासोबत श्रीलंकेला जाता आलेले नाही. ऑस्ट्रेलियन संघ पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिका खेळणार आहे, तर एकदिवसीय आणि टी-२० मध्ये अॅरॉन फिंच संघाचे नेतृत्व करताना पाहायला मिळेल.
क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, गेल्या सहा वर्षांतील ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच श्रीलंका दौरा आहे. या दौऱ्यात २ कसोटी आणि ८ मर्यादित षटकांचे सामने खेळवले जाणार आहेत. गेल्या महिन्यात जस्टिन लँगरच्या जागी अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांची ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मालिकेतील पहिला टी-२० सामना ७ जून रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे सहाय्यक प्रशिक्षक मायकेल डी वेनूटो हे प्रशिक्षक म्हणून संघासोबत असतील. अँड्र्यू मॅकडोनाल्ड दुसऱ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघात सामील होण्याची शक्यता आहे.
Welcome to Sri Lanka! ????#SLvAUS | #CheerForLions pic.twitter.com/JHPIEyiWkW
— Sri Lanka Cricket ???????? (@OfficialSLC) June 2, 2022
मॅकडोनाल्ड यांचा मंगळवारी दुपारी कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलियन सांगा पासून दूर राहावे लागणार आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन संघ सहाय्यक प्रशिक्षक मायकेल डी वेनूटो यांच्यासह श्रीलंकेत पोहोचला आहे. श्रीलंका सध्या प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन संघ तिथे पोहोचला आहे. मात्र, ही मालिका वेळेवर सुरू होईल, असे दक्षिण आशियाई देशाने म्हटले आहे. या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपले तीन मजबूत संघ तयार केले असून ऑस्ट्रेलियाचा हा दौरा सात आठवड्यांचा असणार आहे.
या दौऱ्याची सुरुवात टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांनी होणार आहे. मालिकेतील पहिला टी-२० सामना ७ जून रोजी खेळाला जाईल. त्यानंतर पुढील सामना आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल. तिसऱ्या टी-२० साठी दोन्ही संघ पल्लेकेलेला पोहोचतील. आशिया चषकापूर्वी ऑस्ट्रेलिया संघ श्रीलंकेत क्रिकेट खेळणार असल्याने यजमान संघाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावणार आहे. कारण आशिया चषक स्पर्धेचे आयोजन श्रीलंकेतच होणार आहे. आणि यजमान संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळून आपल्या संघाच्या बांधणीची पूर्ण तयारी करेल.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
