Share

“जेवढं शक्य होतं तितकं…”, जीएसटीवरील भाजपच्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : केंद्र सरकारने राज्यांना जीएसटीचे पैसे दिले आहेत. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. यावरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पेट्रोल-डिझेलच नाही, तर CNG देखील आम्ही साडे तेरा टक्क्यांनी कमी केला. तो आता तीन टक्क्यांवर आणला आहे. साडे तीन हजार कोटी रुपयांचा राज्य सरकारच्या तिजोरीवरचा ताण नागरिकांसाठी आपण सोसला आहे. असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

तसेच जीएसटीची ही रक्कम आत्ताची नाही. त्यामुळे त्याचा इतर बाबींशी संबंध कशाला? राज्यानेही जेवढे शक्य होते तितके पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले आहेत. असेही अजित पवार म्हणाले आहेत. ते मुंबईत बोलत होते.

दरम्यान जीएसटीची आकडेवारी सादर करत अजित पवार यांनी म्हटले की, “मार्च 2022 पर्यंत महाराष्ट्र सरकारकडे येणारी जीएसटीची रक्कम 29 हजार 647 कोटी रुपये होती. त्यापैकी राज्याचे 14 हजार 145 कोटी आपल्याला मिळाले. अजून 15 हजार 502 कोटी रुपये येणे शिल्लक आहे. या रकमेसाठी पाठपुरावा केला जाईल. ”

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!