दिल्ली : अंमलबजावणी संचलनालाय म्हणजेच ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. ईडीकडून नुकतेच यंग इंडिअन मध्ये आर्थिक अनियमितता निदर्शनास आल्या मुळे प्रकरण नोंदवण्यात आले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वित्त शोध निवारण अधिनियमच्या गुन्हेगारी कलमान्वये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. याआधी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि पवन बन्सल यांचीही चौकशी करण्यात आली होती.
राहुल गांधी यांना आजच चौकशीसाठी हजार राहण्यास सांगितले आहे. मात्र राहुल गांधी यांनी ईडीकडून तीन दिवसाची मदत मागितली आहे. ५ जून रोजी ईडीच्या कार्यालयात हजर होणार असल्याचं राहुल गांधी यांच्याकडून कळवण्यात आले आहे. त्यामुळे ईडीकडून राहुल गांधी यांना मुदत दिली जातेय का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राहुल गांधी सध्या विदेशात आहेत. भारतात आल्यावर ते ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच सोनिया गांधी या ८ जून रोजीच ईडीच्या कार्यालयात हजर राहणार असल्याचं सांगण्यात येत असून त्याकडेही संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
काय आहेत आरोप ?
राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडचा पैसा लाटल्याचा आरोप आहे. भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी हा आरोप केला आहे. यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडने ९०.२५ कोटी रुपयांच्या वसुलीचा अधिकार असल्याच्या प्रकरणात एजेएलकडून केवळ ५० लाख रुपयांचीच भरपाई केली होती, असा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयाने स्वामी यांच्या याचिकेवरूनच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस बजावली होती. तसेच याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयात पुरावे सादर करण्याची विनंतीही या याचिकेत करण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या :


