नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (sonia Gandhi) यांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरही काँग्रेस नेत्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याबाबत माहिती दिली आहे.
दरम्यान कालच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता सोनिया गांधींची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. बुधवारी संध्याकाळी सोनिया गांधी यांना ताप आला होता. तापाची हलकी लक्षण समोर आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली गेली.
दरम्यान कालच अंमलबजावणी संचलनालाय म्हणजेच ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना ८ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. यानंतर काँग्रेसकडून तीव्र संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- एमएस धोनी म्हणतोय ! “मी माझ्या जिल्ह्यासाठी आणि शाळेसाठी क्रिकेट खेळलो नसतो तर…”
- “अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ करा” ; गोपीचंद पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- शर्मिली वाघीण आणि तिच्या चिमुकल्या बछड्यांची बाललीला कॅमेऱ्यात कैद
- Deepak Chahar Wedding : दीपक चाहर अडकला विवाहबंधनात, जया भारद्वाजसोबत घेतले सात फेरे
- अखेर ‘केके’ यांच्या मृत्यूचे कारण समजले, पोस्टमार्टम रिपोर्टमधून माहिती समोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

