Share

काँग्रेसचा स्वबळाचा नारा केवळ महत्त्व वाढवण्यासाठीच असल्याचा दावा ‘किती खरा, किती खोटा’

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : काँग्रेस आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यात मराठवाड्यातील काँग्रेसचे नेते अमित देशमुख हे देखील स्वबळावर औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे सांगत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची आणि अमित देशमुख यांची भेट महत्त्वाची ठरते. औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीचे यशापायश यावर अवलंबून आहे.
अमित देशमुख यांच्या भेटीनंतर ‘महाराष्ट्र देशा’ने चंद्रकांत खैरे यांना या भेटीमध्ये काय चर्चा झाली याविषयी प्रश्न विचारला होता. त्यावर खैरे यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. मात्र, महानगर पालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याच्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट नकार दिला. काँग्रेसचे नेते कार्यकर्त्यांना खुष करण्यासाठी अशी विधाने करत असल्याचं ते म्हणाले.

महाविकास आघाडीबाबत शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हेच निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आगामी महानगर पालिका निवडणूक महाविकास आघाडी लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इतकेच नाही तर औरंगाबादमध्ये शिवसेनेची ताकद मोठी आहे. त्यामुळे काँग्रेस जास्तीच्या जागा मिळवण्यासाठी स्वबळाचा केवळ दावा करत असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले स्वत: स्वबळाचा दावा करत असताना शिवसेना नेते मात्र, महाविकास आघाडीच निवडणुका लढवणार असल्याचे स्पष्ट करत आहे. त्यामुळे काँग्रेस केवळ निवडणुकीमध्ये स्वत:चे महत्त्व वाढवण्यासाठीच स्वबळाचा दावा करत आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय. मात्र, हा दावा ‘किती खरा किती खोटा’ याचे उत्तर आगामी काळातच समोर येईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!