औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील सर्व कोरोना रुग्णांना उपचार मिळावे व आवश्यक त्या रुग्णांना कोविड केअर सेंटर येथे भरती करून घेणे आवश्यक आहे. यासाठीच शहरांमध्ये अनेक मंगल कार्यालय देखील ताब्यात घेण्यात येत आहे. त्याची प्रक्रियाही आता पालिकेने सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात ३१ मंगल कार्यालये ताब्यात घेतली जाणार आहे. तर आवश्यक साहित्य खरेदीही सुरू केली आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
मागील काही दिवसांत जिल्ह्यात दररोज एक हजारपेक्षा अधिक कोरोना रूग्ण आढळत असल्याने आरोग्य यंत्रणेतील उपलब्ध बेड्स कमी पडत आहेत. मागील काही दिवसांत कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट हा १५ वरून थेट ३२ टक्क्यांवर पोहचला आहे. यावरून शहरात कोरोनाचा संसर्ग किती गतीने पसरतो आहे, याची प्रचिती येते. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात पुरेशा प्रमाणात खाटा उपलब्ध ठेवण्यासाठी प्रशासनाने यंत्रणांना निर्देशित केलेले आहे.
मागील काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात दररोज दिड हजारपेक्षा अधिक रुग्ण निघत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने कोविड केअर सेंटर्सची संख्या वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. गतवर्षी ज्या इमारती क्वारंटाइन सेंटर म्हणून वापरल्या जात होत्या त्या इमारती यंदा कोविड केअर सेंटर म्हणून वापरल्या जात आहेत. मात्र तरीही कोविड केअर सेंटरची संख्या आणि वाढते रुग्ण यांच्या मोठी तफावत निर्माण झाल्याने आता कोविड केअर सेंटरसाठी मंगल कार्यालये ताब्यात घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला.
यासाठी साठ मंगल कार्यालयांची यादी प्रशासनाने तयार केली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३१ मंगल कार्यालये ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. पालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, पहिल्या टप्प्यात ३१ मंगल कार्यालये ताब्यात घेतली जात आहेत. ही कार्यालये ताब्यात घेण्यासाठी त्या त्या प्रभाग अधिकार्यांना पत्र दिले आहे. आज ही मंगल कार्यालये ताब्यात घेतली जातील. त्यानंतर तेथे आवश्यक त्या सुविधा उभ्या करून कोविड केअर सेंटर सुरु करण्याचे नियोजन आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राजस्थान रॉयल्समध्ये जोफ्रा आर्चरच्या जागी ‘हे’ नवीन पर्याय
- ऑपरेशन लोटस सुरु ? चंद्रकांतदादा म्हणाले, पहाटेच्या शपथविधी सारखं समजेलच !
- शहरात चार ठिकाणी उभारणार जम्बो फॅसिलिटी कोविड सेंटर
- हा लॉकडाऊन काँग्रेसला अमान्य, पक्षातील वरिष्ठांशी चर्चा करणार – हिशाम उस्मानी
- पंढरपूर पोटनिवडणूक : भाजपचं ठरल ! ‘हा’ नेता उद्या भरणार उमेदवारी अर्ज


