Share

राजस्थान रॉयल्समध्ये जोफ्रा आर्चरच्या जागी ‘हे’ नवीन पर्याय

Published On: 

मुंबई : राजस्थान रॉयल्सचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चर हा दुखापतीमुळे या हंगामात खेळणार नाही. जोफ्रा आर्चर हा राजस्थानचा प्रमुख गोलंदाज आहे. आर्चरच्या संदर्भात इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने एक निवेदन जाहीर केले होते. ज्यामध्ये आर्चरच्या कोपराची शस्त्रक्रिया होणार असल्याने तो २-३ महिने क्रिकेटपासून दुर राहणार आहे. राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएलआधी हा खुप मोठा धक्का होता.

मात्र आता राजस्थानने आर्चरच्या जागी नव्या पर्यायाचा शोध सुरु केला आहे. त्यांच्यापुढे काही महत्वाची नावे समोर आली आहे. त्यातील पहिले नाव आहे न्युझीलंडचा मॅट हेन्री. मॅटने नुकतीच बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय मालिकेत ३ सामन्यात ६ बळी घेतले आहे. आयपीएलमध्ये त्याने पंजाबकडून खेळताना २ सामन्यात १ गडी बाद केला होता. मात्र हेन्रीकडे १४०किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करु शकतो.

दुसरा पर्याय आहे शेल्डन कॉट्रेल. कॉट्रेलने पंजाब कडून ६ सामने खेळत ६ गडी बाद केले आहे. यंदाच्या आयपीएल लीलावात त्याला कोणीच खरेदी केले नव्हते. राजस्थान साठी तिसरा पर्याय आहे तो ऑस्ट्रेलियाचा जेसन बेगरडॉर्फ याआधी मुंबईने त्याला १.५कोटीत खरेदी केले होते. मात्र दुखापतीमुळे तो खेळु शकला नाही. यंदाच्या आयपीएलसाठी जेसन हा आर्चरच्या जागी सर्वोत्तम पर्याय ठरु शकतो. यंदाच्या मोसमात राजस्थानच्या संघाचे नेतृत्व हे संजु सॅमसन हा करणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!