Share

हा लॉकडाऊन काँग्रेसला अमान्य, पक्षातील वरिष्ठांशी चर्चा करणार – हिशाम उस्मानी

Published On: 

औरंगाबाद : शहरातील लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षातील कुठल्याही अध्यक्षांना, नेत्यांना विचारात न घेता हा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यात पुन्हा एकदा गरिब जनताच भरडली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर काँग्रेस कमिटीचा या लॉकडाऊनला सक्त विरोध आहे. याबाबत पक्षातील वरिष्ठ नाना पटोले, अमित देशमुख यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. सोबतच सुभाष देसाई, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील ऑनलाईन निवेदन पाठवून लॉकडाऊनबाबत फेरविचार करण्यासाठी आग्रही भूमिका घेणार असल्याचे काँग्रेसचे औरंगाबाद शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलतांना सांगितले.

दररोज शहरात हजारांच्या पुढे रुग्णसंख्या निघत आहे. संपूर्ण शहर हॉटस्पॉट होण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले असतांना औरंगाबाद शहरात ३० मार्चपासून संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. ३० मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत हा लॉकडाऊन लागू असेल. लॉकडाऊनच्या काळात किराणा दुकाने, दूध, भाजी देखील दुपारी १२ पर्यंतच उपलब्ध होणार आहे. त्यानंतर मात्र सर्व गोष्टी बंद केल्या जातील.

याविषयी पुढे बोलतांना उस्मानी म्हणाले, हा निर्णय घाईगडबडीत घेतला आहे. एवढ्या मोठ्या शहराचा निर्णय त्या शहरातील लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करुन घ्यायला हवा होता. हा लॉकडाऊन रद्द करावा अथवा सर्वांच्या संमतीने, चर्चेअंती ठरवावे. दुकानात जाऊन सामान घेण्यासाठी हातावर पोट भरणाऱ्यांकडे पैसे तर हवेत ना? दानशूर व्यक्ती परत मदत करतील का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!