Share

शहरात चार ठिकाणी उभारणार जम्बो फॅसिलिटी कोविड सेंटर

Published On: 

औरंगाबाद : शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. शहरात दररोज हजारपेक्षा अधिक रूग्ण निघत असल्याने त्याप्रमाणात उपलब्ध आरोग्य सेवा कमी पडत आहे. बेड्सचा मोठा गंभीर प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. त्यामुळे आता महापालिकेने शहरात आणखी चार ठिकाणी जम्बो फॅसिलिटी कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सोबत ३१ मंगल कार्यालयेही कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार आहेत.

शहरात वाढल्या रूग्णसंख्येमुळे सर्वांना आरोग्य सेवा पुरवण्याचा मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. अनेक रूग्णांना बेड्स उपलब्ध होत नसल्याने त्यांची हेळसांड होत आहे. आजघडीला औरंगाबाद शहरात  बेड्सअभावी तब्बल ४ हजार ७२७ कोरोना रूग्णांना घरीच होम आयसोलेशनमध्ये उपचार दिले जात आहे. आगामी काळात कोरोना संसर्गाचा आणखी उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शहरातील परिस्थिती पाहता आणखी कोविड केअर सेंटर सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.

त्यामुळे पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी पालिकेच्या वतीने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी शहरात आणखी चार ठिकाणी सर्व सुविधायुक्त जम्बो कोविड केअर सेंटर लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शुक्रवारी त्यांनी विभागीय क्रीडा संकुल येथील ३ हॉस्टेल, दर्गा रोड येथील श्रीहरी पॅव्हेलीयन, कलाग्राम समोरील मराठवाडा रियल टर्स प्रा.ली व आयडिया कॉल सेंटर येथे पाहणी केली. यावेळी त्यांचे समवेत शहर अभियंता एस.डी. पानझडे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी चारही ठिकाणी अद्ययावत सुविधा देऊन कोविंड केअर सेंटरची निर्मिती करण्याचे आयुक्त पांडेय यांनी जाहीर केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!