🕒 1 min read
सोलापूर :- सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी करावयाच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक निधी लवकरच उपलब्ध करून देऊ. त्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी किंवा बुधवारी बैठक घेतली जाणार आहे, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल येथे सांगितले.
उजनी धरणातून पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज बैठक झाली. नियोजन भवनात झालेल्या या बैठकीस जि.प. अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे,महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार प्रणिती शिंदे, महानगरपालिकेचे सभागृह नेते श्रीनिवास करली, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, गटनेते चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे, रियाज खरादी, नगरसेवक महेश कोठे, गणेश पुजारी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आयुक्त पि. शिवशंकर, सोलापूर स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक डेंगळे- पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे आदी उपस्थित होते.
बैठकीत प्रारंभी डेंगळे पाटील यांनी समांतर पाणी वाहिनीबाबतच्या सध्याच्या कामाची स्थिती सांगितले. त्यांनी जॅकवेलच्या कामास जलसंपदा विभागाने स्थगिती दिली असल्याचे सांगितले. त्यावर भरणे यांनी जॅकवेलच्या कामास तत्काळ सुरुवात करावी. 15 जूनपर्यंत काम पूर्ण करावे, असे सांगितले. पाईपलाईनसाठी भूसंपादन भरपाईपोटी रक्कम वाढणार असल्याचे उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी सांगितले.
पाईपलाईन योजनेच्या भूसंपादनासाठी अगोदर 55 कोटी रुपये कळवण्यात आले होते. मात्र आता महसूल विभागाने 130 कोटी रुपये कळवले आहे, या वाढीव मागणीमुळे ज्यादा निधी लागणार आहे. या जादा निधीसाठी पुढील आठवड्यात वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत जादा निधीची मागणी केली जाईल, असे भरणे यांनी सांगितले. याचबरोबर सर्वसाधारण आणि महिलांसाठीच्या खास हॉस्पिटलसाठी निधीची तरतूद करण्याची विनंती करणार आहोत.
या बैठकीस महानगरपालिकेचे अभियंता संजय धनशेट्टी, सिद्धेश्वर उस्तुर्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- दवाखाने फुल्ल, बेड मिळेनात, औषधांचाही तुटवडा… ‘या’ तालुक्यात रविवारपासून जनता कर्फ्यू
- आयपीएल स्पर्धा गाजवल्यानंतर इंग्लंडमध्ये कसोटी पदार्पणासाठी आवेश खान सज्ज
- धोनीने दिलेला शब्द पाळला, एमएस धोनी घरी परतणारा चेन्नईचा शेवटचा खेळाडू ठरला
- ‘तेव्हा शास्त्री यांनी किती रेड वाईन घेतल्या असतील याचा मी विचारही करू शकत नाही’
- प्रीती झिंटासोबत पंजाबचा शाहरुख खानने शेअर केलेल्या फोटोला दिले ‘हे’ कॅप्शन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
