🕒 1 min read
मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये टीम इंडियाची कामगिरी उल्लेखनीय झाली. टीम इंडियाने टेस्ट सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाच्या त्यांच्याच मायभूमीत 2-1 ने पराभव करत इतिहास घडवला. यावेळी भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहली पितृत्वाच्या सुट्टीवर होता. आणि महत्त्वाच्या खेळाडूंना दुखापती झालेल्या असतानाही भारताने टेस्ट सीरिज जिंकली. याचं इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने कौतुक केलं आहे.
यानंतर मात्र, वॉन याने रवी शास्त्री यांना टोला लगावला आहे. ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकल्यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी किती रेड वाईन घेतल्या असतील, याचा मी विचारही करू शकत नाही, यानंतर त्यांनी टीम इंडियाचं कौतुक केलं आहे.
मायकल वॉन पुढे म्हणाला, भारताने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मेलबर्नमध्ये धमाकेदार विजय मिळवला, यानंतर सिडनीमध्ये दुखापत झालेली असतानाही हनुमा विहारी आणि आर.अश्विनयांनी अखेरपर्यंत बॅटिंग करत टेस्ट मॅच ड्रॉ केली. टीम इंडियाचं हे पुनरागमन सर्वोत्कृष्ट होतं, यावेळी त्यांनी ऋषभ पंतच्या बॅटिंगचेही कौतुक केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोरोनाचा लहान मुलांना वाढता धोका लक्षात घेता बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करणार’
- एसटीच्या कर्मचाऱ्यांना लस उपलब्ध करून द्यावी, अनिल परबांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- मी ९६ कुळी मराठा ; कोणाच्या आव्हानाला भीक घालत नाही : शशिकांत शिंदे
- रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजार प्रकरण!, सहा जणांना जामीन मंजूर
- इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ सज्ज ; जाडेजा, विहारीचे भारतीय संघात कमबॅक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
