मुंबई : भारतात आयपीएल स्पर्धेदरम्यान कोरोनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयला स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करावी लागली. मात्र या स्पर्धेत काही भारतीय खेळाडूंनी चमक दाखवत भारतीय संघाचे दार ठोठावले आहे. शुक्रवारी इंग्लंड दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा करण्यात आली. या संघात आयपीएल मध्ये दिल्ली कॅपीटल्सकडून दमदार पुनरागमन करणाऱ्या आवेश खानला संघात स्थान मिळाले.
भारतीय संघात निवड झाल्यानंतर आवेश खानने त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘आयपीएल स्पर्धेतील सर्व दिल्लीच्या सर्व सामन्यात सहभागी होण्याची संधी मीळाली. चांगली कामगीरी करत मी संघाच्या विजयात हातभार लावला याचा मला आनंद आहे. यामुळे माझा आत्मविश्वास खुप वाढला आहे. आता भारतीय संघाकडुन मिळालेली जबाबदारी मी नक्कीच योग्यरित्या पार पाडेन’ असे आवेश खान म्हणाला.
२०१७ आयपीएल स्पर्धेचा भाग असलेल्या आवेश खानला खरी संधी ही २०२१ आयपीएल स्पर्धेत मिळाली. या स्पर्धेत आवेशने ८ सामन्यात १४ गडी बाद करत पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी विराजमान होता. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत आवेश खानने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीला बाद केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- धोनीने दिलेला शब्द पाळला, एमएस धोनी घरी परतणारा चेन्नईचा शेवटचा खेळाडू ठरला
- ‘तेव्हा शास्त्री यांनी किती रेड वाईन घेतल्या असतील याचा मी विचारही करू शकत नाही
- प्रीती झिंटासोबत पंजाबचा शाहरुख खानने शेअर केलेल्या फोटोला दिले ‘हे’ कॅप्शन
- टीम इंडियामधून हार्दिक पांड्याला डच्चु ; ‘या’ कारणामुळे हार्दिकला मिळाले नाही स्थान
- इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ सज्ज ; जाडेजा, विहारीचे भारतीय संघात कमबॅक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

