Share

प्रीती झिंटासोबत पंजाबचा शाहरुख खानने शेअर केलेल्या फोटोला दिले ‘हे’ कॅप्शन

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. या दरम्यान भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. मात्र दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने शिरकाव केल्याने स्पर्धा मध्येच स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर आली.

या स्पर्धेत पंजाबकडून एका खेळाडुने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तो खेळाडु म्हणजे शाहरुख खान. बॉलीवूडच्या शाहरुख खानच्या लोकप्रीयतेमुळे पंजाबच्या शाहरुख खानचीही आयपीएल स्पर्धेदरम्यान चांगलीच चर्चा रंगली होती. आता शाहरुखने तो खेळत असलेला संघ पंजाब किंग्सची मालकीण प्रीती झिंटासोबत एक फोटो पोस्ट केला. या फोटोना शाहरुखने ‘नैना १ २ ३ टिंग’ असे मजेशीर कॅप्शन दिले. नैना हे प्रीतीच्या ‘कल हो ना हो’ या चित्रपटातील पात्राचे नाव आहे. या चित्रपटात शाहरुख खान प्रमुख भूमिकेत होता.

https://www.instagram.com/p/COiPh88DhaI/

आयपीएस २०२१च्या लिलावात प्रीतीने शाहरुख खानला ५ कोटी २५ लाख रुपयांची बोली लावत संघात सामील करुन घेतले होते. आयपीएल २०२१ मध्ये शाहरुखने ८ सामन्यात १०७ धावा केल्या. तर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध ३६ चेंडुत ४७ धावांची खेळी त्याची सर्वोत्तम खेळी होती. मात्र कोरोनामुळे स्पर्धा अर्धवट स्थगित झाल्याने उर्वरित सामन्यात खेळण्याची संधी हुकली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!