मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा रद्द केली. आता ही उर्वरीत स्पर्धा लवकर सुरु होणार नसल्याने आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेल्या परदेशी क्रिकेटपटूंचा आपापल्या देशांत परतण्याचा प्रवास सुरू झाला.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी यानं घेतलेल्या एका निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांचे मन जिंकलं आहे. महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईच्या टीममधील सर्व खेळाडू परतल्यानंतरच रांचीला घरी जाण्याचा निर्णय घेतला होता.
चेन्नईचे खेळाडू जोपर्यंत त्यांच्या घरी सुखरूप परतत नाहीत, तोपर्यंत आपण घरी जाणार नाही, असं धोनीने सांगितलं होतं, त्यानंतर चेन्नईचे सगळे खेळाडू घरी परतल्यानंतर धोनीने टीमचं हॉटेल सोडलं. एमएस धोनी घरी परतणारा चेन्नईचा शेवटचा खेळाडू ठरला.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोरोनाचा लहान मुलांना वाढता धोका लक्षात घेता बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करणार’
- एसटीच्या कर्मचाऱ्यांना लस उपलब्ध करून द्यावी, अनिल परबांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- मी ९६ कुळी मराठा ; कोणाच्या आव्हानाला भीक घालत नाही : शशिकांत शिंदे
- रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजार प्रकरण!, सहा जणांना जामीन मंजूर
- इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ सज्ज ; जाडेजा, विहारीचे भारतीय संघात कमबॅक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
