कागल : कागल तालुक्यात रविवारपासून (दि.९) बुधवारपर्यंत (दि.१९) दहा दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करा, अशा सक्त सूचना प्रशासनाला दिल्या. ज्या तालुक्यात बाधितांची संख्या वाढत आहेत, त्या तालुक्यात जनता कर्फ्यू लावण्यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. जनता कर्फ्यू अत्यंत कडक करा, कुणालाही बाहेर पडू देऊ नका, अशा सूचनाही पोलिस अधिकाऱ्यांना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.
या दहा दिवसांच्या काळात दूध व औषध दुकाने या अत्यावश्यक सेवा सुरू राहतील तसेच पेट्रोल पंप फक्त अत्यावश्यक सेवांना पेट्रोल देण्यासाठी सकाळीच सुरू राहतील. तालुक्यातील कसबा सांगाव, मौजे सांगाव, व्हन्नुर व वंदूर या गावांमध्ये बाधितांची संख्या जास्त आहे. या गावांना रेड अलर्ट एरिया जाहीर करून अँटीजन व आरटीपीसीआर टेस्टसह लसीकरणही वाढवा, अशा सूचनाही मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा गंभीर धोका घराघरांपर्यंत पोहोचला आहे, याचे आतातरी भान ठेवा. ग्राम समित्या व प्रभाग समित्यांनी दक्ष रहा. दवाखान्यांमध्ये बेडसह औषधांचीही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे घरात राहून संसर्गाची साखळी तोडणे हेच आपल्या हातात आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा विषाणू अधिक गंभीर असल्याचे सांगत संसर्ग झाल्यापासून सहावा, सातवा व आठवा हे तीन दिवस फार धोक्याचे असतात. कोणतेही लक्षण दिसताच तात्काळ चाचणी करा. तसेच बाधितांच्या नातेवाईकांनीही तातडीने चाचण्या करा. त्यामुळे संसर्ग वाढणार नाही अशाही मुश्रीफ यांनी सूचना दिल्या.
भारतातील कोरोना परिस्थिती अत्यंत गंभीर बनल्यामुळे संपूर्ण जगभरातून साहित्य आणि औषधे येत आहेत. जगातून येणारे साहित्य व औषधे रुग्णांच्या प्रमाणात त्या – त्या राज्यांना वाटले पाहिजे. तिसऱ्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी लवकरच कागलमध्ये ऑक्सीजन प्रकल्प व एच.आर.सी.टी. स्कॅन यंत्रणाही कार्यान्वित करणार.
आपल्याकडे कामानिमित्त येणाऱ्या जनतेने फोनवरून काम सांगावे, असेही मुश्रीफ यांनीआव्हान केले.
बैठकीला प्रांताधिकारी प्रसेन्नजित प्रधान, तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कागल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता पाटील, कागलचे मुख्याधिकारी पंडित पाटील, मुरगूडचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, कागल कोविड केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित शिंदे, डॉ. नवनाथ मगदूम, डॉ. अमर पाटील, कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुरगूडचे पोलीस उपनिरीक्षक विकास बडवे, सहाय्यक गटविकास अधिकारी आप्पासाहेब माळी, कागलचे नगर अभियंता सुनील माळी, मुरगूड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी तारळकर आदी अधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- आयपीएलमध्ये कोरोनाच्या एन्ट्रीनंतर राजस्थान रॉयल्स संघातील वातावरण कसे होते? ख्रिस मॉरिसने केला खुलासा
- आयपीएल स्पर्धा गाजवल्यानंतर इंग्लंडमध्ये कसोटी पदार्पणासाठी आवेश खान सज्ज
- धोनीने दिलेला शब्द पाळला, एमएस धोनी घरी परतणारा चेन्नईचा शेवटचा खेळाडू ठरला
- ‘तेव्हा शास्त्री यांनी किती रेड वाईन घेतल्या असतील याचा मी विचारही करू शकत नाही’
- प्रीती झिंटासोबत पंजाबचा शाहरुख खानने शेअर केलेल्या फोटोला दिले ‘हे’ कॅप्शन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

