पुणे : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्याने गाईडलाईन जारी केल्या आहेत. त्यानुसार आज रात्री ८ वाजल्यापासून ते पहाटे ७ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच चौपाट्या, उद्याने, मॉल, सिनेमागृह यासाठीही सरकारने अनेक निर्बंध घातले असून सर्व प्रकारच्या कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली आहे.
यासोबतच, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन देखील करण्यात येत आहे. मात्र, पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यास विरोध असल्याचं भाष्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ‘लॉकडाऊन असताना सुद्धा रुग्ण संख्या वाढली होती. त्यामुळे सद्याच्या परिस्थितीवर लॉकडाऊन हा पर्याय नाही. त्यामुळे लॉकडाऊनला माझा विरोध राहीलं,’ असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांशी भेट झाली ? अमित शाहांच्या विधानामुळे खळबळ
- उद्धव ठाकरेंना कणा नाही, आता नवं सरकार यावं – प्रकाश आंबेडकर
- अहमदाबाद येथे अमित शहा-शरद पवार यांची भेट ? राष्ट्रवादीची मोठी प्रतिक्रिया…
- महाविकास आघाडीतील नेत्यांनीच मिठाचा खडा टाकू नये; अजितदादांनी राऊतांना झापलं
- ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदींकडून खेळाडूंचं कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

