नवी दिल्ली : राज्यात राष्ट्रवादी,शिवसेना आणि कॉंग्रेस हे एकत्रित येत महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून सचिन वाझे प्रकरण परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब यामुळे सरकार कुठेतरी अडचणीत आले आहे. यावरून महाविकास आघाडीत खटके उडायला सुरवात झाली आहे. अशातच गुजरातमधून राज्याच्या राजकारणाला हलवून टाकणारी एक बातमी समोर आली आहे.
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी भाजपच्या निकटवर्तीय बड्या उद्योगपतीची भेट घेतल्याची माहिती आहे. अहमदाबादच्या फार्महाऊसवर ही भेट झाली. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर या भेटीचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अहमदाबादमधील फार्महाऊसवर 26 मार्चच्या रात्री 9.30 वाजता ही भेट झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पटेलांची संबंधित उद्योजकाशी भेट झाली, त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही त्यावेळी अहमदाबादेतच होते. मात्र या बैठकीला पवार उपस्थित होते का, याची पुष्टी मिळालेली नाही.
दुसरीकडे, शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती एका गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. शांतिग्राममधील गेस्टहाऊसला पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे
राष्ट्रवादी काँग्रेसने हे वृत्त फेटाळून लावले असून राज्यातील विविध नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, आता या भेटीवर खुद्द अमित शाह यांनी भाष्य केलं आहे. पश्चिम बंगाल मधील निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पवारांच्या भेटीवर देखील मौन सोडलं आहे. ‘सर्व काही सार्वजनिक केले जाऊ शकत नाही,’ असं सूचक विधान अमित शाह यांनी केलं आहे. दरम्यान, त्यांच्या या विधानामुळे ‘ऑपरेशन लोटस’ बाबतच्या चर्चा सुरु झाल्या असून गूढ अधिकच वाढलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शरद पवार साहेब कधी कोणाला भेटतील याचा नेम नसतो…’
- उद्धव ठाकरेंना कणा नाही, आता नवं सरकार यावं – प्रकाश आंबेडकर
- अहमदाबाद येथे अमित शहा-शरद पवार यांची भेट ? राष्ट्रवादीची मोठी प्रतिक्रिया…
- महाविकास आघाडीतील नेत्यांनीच मिठाचा खडा टाकू नये; अजितदादांनी राऊतांना झापलं
- ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदींकडून खेळाडूंचं कौतुक


