पुणे : भारत आणि इंग्लडसंघात आज वनडे मालिकेचा तिसरा व अखेरचा सामना रंगत आहे. आजच्या सामन्यासाठी इंग्लंड संघाचा प्रभारी कर्णधार जोस बटलरने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झाले आहेत. भारतीय इलेव्हनमधून कुलदीप यादवला बाहेर केले असून टी नटराजनचा समावेश करण्यात आला आहे.
आजचा सामना जिंकून मालिका विजयी होण्याची दोन्ही संघांकडे अखेरची संधी असेल. विशेष म्हणजे यापूर्वी इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाने कसोटी आणि टी-20 मालिका जिंकली असल्याने एकदिवसीय सिरीज जिंकून भारत इंग्लिश टीमचा सफाया करू इच्छित असतील.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. कर्णधार म्हणून विराटचा हा २०० वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. २०० सामन्यात कर्णधारपद भूषवणारा विराट भारताचा तिसरा तर जगातील आठवा खेळाडू ठरला आहे.
यामध्ये महेंद्रसिंह धोनी (भारत) – ३३२, सामनेरिकी पाँटिंग (आयसीसी / ऑस्ट्रेलिया) – ३२४, सामनेस्टीफन फ्लेमिंग (न्यूझीलंड) – ३०३, सामनेग्रीम स्मिथ (दक्षिण अफ्रीका / आईसीसी /आफ्रिका XI) – २८६, सामनेएलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया) – २७१, सामनेअर्जुणा रणतुंगा (श्रीलंका) – २४९, सामनेमोहम्मद अजहरुद्दीन (भारत) – २२१, सामनेविराट कोहली (भारत) – २००*, सामने आदी खेळाडू २०० किंवा त्यापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामन्यात कर्णधारपद भूषवणारे आहेत.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांशी भेट झाली ? अमित शाहांच्या विधानामुळे खळबळ
- उद्धव ठाकरेंना कणा नाही, आता नवं सरकार यावं – प्रकाश आंबेडकर
- अहमदाबाद येथे अमित शहा-शरद पवार यांची भेट ? राष्ट्रवादीची मोठी प्रतिक्रिया…
- महाविकास आघाडीतील नेत्यांनीच मिठाचा खडा टाकू नये; अजितदादांनी राऊतांना झापलं
- ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदींकडून खेळाडूंचं कौतुक


