मुंबई – सध्या महाराष्ट्रात भयानक परिस्थिती आहे. एकीकडे महामारी तर दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती महाराष्ट्रावर ओढावली आहे. राज्यातील सरकार ‘शिवशाही’ नसून ‘शवशाही’ बनलं आहे. अशा शब्दात भाजपाचे नवनियुक्त राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी टीका केली आहे. वसंत स्मृती, दादर येथील मुंबई भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिका यांच्या अपयशावर प्रकाश टाकताना भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला म्हणाले की, देशातील कोरोना मृत्यूच्या एकूण मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे मुंबई शहरात सर्वाधिक मृत्यूंची संख्या आहे. असे असतानाही मिडीयाला गुंडाळून बेस्ट सीएम, बेस्ट महापालिकाचं अवॉर्ड मिळवण्यात मुख्यमंत्री व्यस्त आहेत असा खरमरीत टोला भाजपा राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या सध्या सुरू असलेल्या सरसकट भ्रष्टाचाराकडे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुक्ला यांनी लक्ष वेधले आहे. ते म्हणाले की, विकासकामांवर दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करूनही मुंबई दरवर्षी पावसात तुंबतेच. नाल्यांच्या साफसफाईसाठी मुंबई महानगरपालिका दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करूनही अद्यापही या सरकारला पावसाळ्यामध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा करणारी योग्य यंत्रणा तयार करता आलेली नाही. सध्याचे सरकार आणि मुंबई महानगरपालिका काही मोजक्या ठेकेदारांना फायदा मिळवून देण्यासाठी काम करीत आहेत.
महाराष्ट्र सरकार गृहमंत्र्यांसाठी दरमहिना करोडो रुपये मुंबई पोलिस विभागातूनच उकळत आहे; यासंदर्भात सीबीआय चौकशी करीत असून चौकशी थांबवण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या फेऱ्या मारत आहे, असा हल्लाबोल प्रेम शुक्ला यांनी राज्य सरकारवर केला आहे.दरम्यान, कोरोना काळात मोठ्या प्रमाणात मृत्यू संख्येची अफरातफरी करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची खरी संख्या सरकार लपवत असल्याचा आरोप आमदार मंगल प्रभात लोढा यांनी राज्य सरकारवर केला आहे. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांच्यासह भाजपाचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, मिडीया प्रमुख श्वेता परुळकर उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे अनिल परब हे पळकुटे मंत्री’
- दोन मुलांचे धोरण देशभरात राबवणार का?, केंद्राने संसदेत दिले ‘हे’ उत्तर
- ‘डोक्यावर मृत्यू दिसत असूनही नागरिकांना मरणासाठी का सोडले?, भाजपाचा संतप्त सवाल
- ‘राज्यावरील संकटात मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा अर्थ म्हणजे ‘मला जमत नाही!’
- अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आता मदतीचा ओघ सुरु, निलेश राणेंचा पूरग्रस्तांना मदतीचा हात


