चिपळूण – महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, गुहागर, पाटण, शिराळा, कोल्हापूर अशा अनेक शहरांमध्ये पूरस्थिती गंभीर असून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ आणि सैन्यदलांची मदत घेण्यात येत आहे. लष्करासोबतच नौदलही बचाव आणि मदतकार्यात सहभागी झालं आहे.
अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आता मदतीचा ओघ सुरु झाला असून चिपळूण खेर्डी येथील सती समर्थनगर येथील सुमारे 80 ते 90 पूरग्रस्त कुटुंबांना माजी खासदार तथा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस निलेश राणे यांनी चटई, ब्लँकेट आणि जीवनावश्यक वस्तू देऊन मदत केली. यावेळी पूरग्रस्तांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. या मदतीसाठी नागरिकांनी राणे यांचे आभार मानले आहेत.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुमती जाखड, पोलीस अधिक्षक मोहित कुमार गर्ग यांच्याकडून भाजप नेते निलेश राणे यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेतला आणि नागरिकांना मदत केली. रत्नागिरीमध्ये नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरु असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. सर्वांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे अनिल परब हे पळकुटे मंत्री’
- दोन मुलांचे धोरण देशभरात राबवणार का?, केंद्राने संसदेत दिले ‘हे’ उत्तर
- ‘डोक्यावर मृत्यू दिसत असूनही नागरिकांना मरणासाठी का सोडले?, भाजपाचा संतप्त सवाल
- ‘राज्यावरील संकटात मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा अर्थ म्हणजे ‘मला जमत नाही!’
- ‘राज्यात अतिवृष्टी व महापूराची अभूतपूर्व परिस्थिती’ ; अजित पवारांनी व्यक्त केले दु:ख
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

