🕒 1 min read
मुंबई : बेफाम कोसळणारा पाऊस, अंगणातील पाणी घरात घुसल्यानं विझलेल्या चुली, कष्टानं घेतलेली वाहनं काही क्षणांत पाण्याखाली गेली. व्यापारपेठा बुडाल्या, दुकानांमध्येही पाणी शिरले. जीव मुठीत घेऊन लोके छपरांवर गेली. ढगच फाटल्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र भीषण महापुराचा सामना करीत असताना गुरुवारची रात्र काळरात्र ठरली. तुफान पावसामुळे राज्यावर दरडसंकट कोसळले आणि त्यात ८५ जणांचा बळी गेला.
‘राज्यावर अनपेक्षित असं हे संकट आलं आहे. हवामान खात्यानं अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला होता. मात्र, आता आपल्याला आता काही शब्दांची व्याख्याच बदलावी लागेल. कारण, त्यापलीकडं जाऊन सगळं घडत आहे. अशा परिस्थितीत जीवितहानी होऊ न देण्यास प्रशासनाचं प्राधान्य आहे,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यावर सांगितले.
‘तसेच ढगफुटीचा अंदाज कोणी करू शकते असे मला वाटत नाही. अतिवृष्टीची व्याख्या कुठपर्यंत न्यायची याचा अंदाज आलेला नाही. नेमकी ढगफुटी कुठे होऊ शकते हे देखील कोणी सांगू शकत नाही. तसेच दरडी कोसळणार असाही अंदाज कोणी व्यक्त करू शकत नाही’ असे वक्तव्य मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहेत.
३ शब्दांत सांगायच तर "मला जमत नाहीये"@CMOMaharashtra pic.twitter.com/ozOWsBAj28
— Shweta Mahale Patil (@MLAShwetaMahale) July 23, 2021
त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांकडून टीका होत आहे. भाजपच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनीही या अनुषंगाने ठाकरेंना टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याचा अर्थ तीन शब्दांत सांगायचे झाल्यास ‘मला जमत नाही’ असाच होतो असे ट्विट महाले यांनी केले आहे.
काल शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरे हे मंत्रालयात दाखल झाल्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सोशल मीडियातून टोला लगावला आहे. ‘मुख्यमंत्री मंत्रालयात… ही बातमी व्हावी इतके वाईट दिवस महाराष्ट्रावर आलेत….हा दिवस उगवण्यासाठी राज्यात शेकडो बळी जावे लागले’ अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज्यात अतिवृष्टी व महापूराची अभूतपूर्व परिस्थिती’ ; अजित पवारांनी व्यक्त केले दु:ख
- आयपीएलसाठी सीएसके आणि दिल्ली संघ ‘या’ तारखेला दुबईला रवाना
- मुंबई गुन्हे शाखेचे पथक राज कुंद्राला घेवून पोहचले थेट शिल्पा शेट्टीच्या बंगल्यावर
- मुख्यमंत्र्यांचा निर्णय; दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना पाच लाखांची मदत
- दहावीनंतर आता प्रतिक्षा बारावीच्या निकालाची, औरंगाबाद विभागातील ४२ टक्के काम पूर्ण!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
