नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार ‘दोन मुलांचे’ धोरण आणत आहे. लोकसंख्येचा स्फोट झाल्याने भारतात बेरोजगारी आणि गरीबी वाढली आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण गरजेचं आहे अशा भावनेतून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने ‘हम दो हमारे दो’ अशा स्वरूपाचं धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपशासित आसाम राज्यातही याच प्रकारचे धोरण राबवण्याच्या हालचाली सुरू आहेत.
त्यामुळे केंद्र सरकार पण संपूर्ण देशाकरिता असे धोरण राबवणार का याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. पण आता दोन मुलांचे धोरण आणणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. भाजपचे सदस्य उदय प्रताप सिंह यांच्या प्रश्नावर आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी शुक्रवारी लोकसभेत हे उत्तर दिले. ‘दोन मुलांचे धोरण आणण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे का? असा प्रश्न उदय प्रताप सिंह यांनी आरोग्य मंत्रालयाला विचारला होता. त्यावर मंत्र्यांनी ‘नाही’ असे मोजक्या शब्दांतच उत्तर दिले.
लोकसंख्या नियंत्रण धोरणाला औवैसींचा विरोध
दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या लोकसंख्या नियंत्रण धोरणाला एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी विरोध केला आहे. आपला दावा सिद्ध करण्यासाठी ओवैसी यांनी मोदी सरकारने २०२० मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा आधार घेतला आहे. ‘डिसेंबर २०२० मध्ये केंद्रातील मोदी सरकारने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं की जन्मदर घटू लागल्यामुळे देशात दोन अपत्य धोरण राबवता येणार नाही. पण दुसरीकडे आता योगी सरकार मात्र त्यालाच विरोध करत आहे. हा प्रस्ताव मांडून योगी सरकार मोदी सरकारच्या विरोधात जाणार का?’ असा सवाल ओवैसींनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज्यात अतिवृष्टी व महापूराची अभूतपूर्व परिस्थिती’ ; अजित पवारांनी व्यक्त केले दु:ख
- आयपीएलसाठी सीएसके आणि दिल्ली संघ ‘या’ तारखेला दुबईला रवाना
- मुंबई गुन्हे शाखेचे पथक राज कुंद्राला घेवून पोहचले थेट शिल्पा शेट्टीच्या बंगल्यावर
- मुख्यमंत्र्यांचा निर्णय; दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना पाच लाखांची मदत
- दहावीनंतर आता प्रतिक्षा बारावीच्या निकालाची, औरंगाबाद विभागातील ४२ टक्के काम पूर्ण!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
