मुंबई : चिपळूण या ठिकाणी महापुराने विळखा घातला आहे. कोविड सेंटर असलेल्या अपरांत हॉस्पिटलमध्ये पुराचे पाणी शिरल्याने वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे ऑक्सिजनवर असलेल्या ८ रुग्णांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे चिपळूणमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. तर अशा वेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी मुंबईला पळ काढला. त्यामुळे भाजपच्या चित्रा वाघ यांनी अनिल परब यांच्यावर सोशल माध्यमावर टीका केली आहे.
‘आस्मानी संकटामुळं चिपळूणचे नागरिक अन्न-पाण्यावाचून तडफडतायेत. एवढचं नाही तर पुरामुळे दवाखान्यातून ॲाक्सिजन पुरवठा रद्द झाल्याने एकाच दिवशी ८ कोविड रूग्ण दगावले. अशा वेळेस अनिल परब पालकमंत्री म्हणून जनतेच्या पाठीमागे खमकेपणाने उभं राहण्याऐवजी रात्रीतून मुंबईला पळ काढतात. अशा संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले ? हे तर पळकुटे मंत्री’. अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
अशा संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले ? हे तर पळकुटे मंत्री..!! (२/२)@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @bb_thorat @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 24, 2021
२००५ नंतर पहिल्यांदाच चिपळूण येथे पावसाची भयावह स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने कोकण पाण्याखाली गेले आहे.आतापर्यंत ७१ जणांचा पावसाने बळी घेतला आहे. तर दरड कोसळून २१ जणांचा मृत्यू झाला आहे. अशा वेळेस पालकमंत्री अनिल परब यांनी पूरग्रस्त ठिकाणाहून पळ काढल्याने त्यांच्यावर भाजपकडून टीका कली जात आहे. दरम्यान एनडीआरएफची २ पथके, आर्मीचे १ पथक, नौदलाची २ पथके, हवाईदलाचे २ पथके तसेच १५ स्वयंसेवी संस्थांमार्फत बोंटीद्वारे या ठिकाणी मदत कार्य सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दोन मुलांचे धोरण देशभरात राबवणार का?, केंद्राने संसदेत दिले ‘हे’ उत्तर
- ‘डोक्यावर मृत्यू दिसत असूनही नागरिकांना मरणासाठी का सोडले?, भाजपाचा संतप्त सवाल
- ‘राज्यावरील संकटात मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा अर्थ म्हणजे ‘मला जमत नाही!’
- ‘राज्यात अतिवृष्टी व महापूराची अभूतपूर्व परिस्थिती’ ; अजित पवारांनी व्यक्त केले दु:ख
- आयपीएलसाठी सीएसके आणि दिल्ली संघ ‘या’ तारखेला दुबईला रवाना


