Share

‘डोक्यावर मृत्यू दिसत असूनही नागरिकांना मरणासाठी का सोडले?, भाजपाचा संतप्त सवाल

Published On: 

मुंबई : मुसळधार पावसाने कोकण भाग पाण्याने वेढला आहे. २००५ नंतर पहिल्यांदाच या ठिकाणी पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. पावसाने अनेकांचे बळी घेतले आहे. रत्नागिरी, कोकण, रायगड, पालघर, ठाणे, नाशिक, पुणे या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर पावसामुळे चिपळूण येथे २१ जणांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील तळीये गावात दरड कोसळून 36 जणांचा मृत्यू झाला आहे.

ढगच फाटल्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र भीषण महापुराचा सामना करीत असताना गुरुवारची रात्र काळरात्र ठरली. तुफान पावसामुळे राज्यावर दरडसंकट कोसळले आणि त्यात ८५ जणांचा बळी गेला. यावेळी डोक्यावर मृत्यू दिसत असूनही नागरिकांना मरणासाठी का सोडलं? असा सवाल भाजपने ठाकरे सरकारला केला आहे.

‘ढगफुटी म्हणजे काय आणि अतिवृष्टीची नवी व्याख्या काय ते शास्त्रज्ञ-संशोधक बघून घेतील. दरडग्रस्त तळीये गावात काल प्रशासन पोहोचूनही गावकऱ्यांचे स्थलांतर का झालं नाही, हे महाराष्ट्राला ऐकायचंय. डोक्यावर मृत्यू दिसत असूनही नागरिकांना मरणासाठी का सोडलं?’ असा संतप्त सवाल भाजपने समाज माध्यमावर करत ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर घेतले आहे.

‘राज्यावर अनपेक्षित असं हे संकट आलं आहे. हवामान खात्यानं अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला होता. मात्र, आता आपल्याला आता काही शब्दांची व्याख्याच बदलावी लागेल. कारण, त्यापलीकडं जाऊन सगळं घडत आहे. अशा परिस्थितीत जीवितहानी होऊ न देण्यास प्रशासनाचं प्राधान्य आहे,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यावर सांगितले.

तसेच ढगफुटीचा अंदाज कोणी करू शकते असे मला वाटत नाही. अतिवृष्टीची व्याख्या कुठपर्यंत न्यायची याचा अंदाज आलेला नाही. नेमकी ढगफुटी कुठे होऊ शकते हे देखील कोणी सांगू शकत नाही. तसेच दरडी कोसळणार असाही अंदाज कोणी व्यक्त करू शकत नाही असे वक्तव्य मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!