🕒 1 min read
मुंबई- 22 वर्षीय पूजा चव्हाण हिने वानवडी येथे संशयास्पद मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मात्र पूजाच्या मृत्युच्या दुसऱ्याच दिवशी पूजासोबत असलेले अरुण राठोड व विलास चव्हाण यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले
दरम्यान, या प्रकरणात शिवसेनेचे वन मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने एकच खळबळ उडाली.चौफेर टीका झाल्याने तसेच महाविकास आघाडीच्या अडचणी देखील वाढू लागल्याने रविवारी या प्रकरणात संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
दरम्यान, एका बाजूला राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत असले तरीही वास्तविक चित्र काही वेगळेच असल्याची चर्चा सुरु झाली आहे. संजय राठोड यांचा राजीनामा अजून राज्यपालांकडे पाठवलाच नसल्याची माहिती समोर येत आहे. तीन दिवस उलटले तरी संजय राठोड यांचा राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांकडेच आहे का? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.
रविवारी संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी विचारणा केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, राजीनामा फ्रेक करुन लावण्यासाठी घेतला नाही. मात्र संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे अद्याप पोहोचलेला नसल्याची चर्चा आहे.यामुळे कायदेशीरदृष्ट्या संजय राठोड वनमंत्री पदावर कायम आहेत.
राजीनामा दिल्यावर संजय राठोड यांची प्रतिक्रिया
”मी माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आहे. पूजा चव्हाणचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि या मृत्युवरुन विरोधी पक्षाने राजकारण करत मला उद्धवस्त करण्याचं काम केलं. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी ही माझी भूमिका आहे, खरं सत्य बाहेर यावं ही माझी भूमिका आहे आणि हेच मी मुख्यमंत्र्यांनाही सांगितलं.”
महत्त्वाच्या बातम्या
- सोनपेठ येथील क्रीडा संकुलासाठी सर्वोतोपरी मदत करणार; क्रीडा मंत्र्यांचे आश्वासन
- मिटकरी भावा तू आता आला,माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, त्यांनाच विचार
- महाविकास आघाडी नव्हे, हे तर निजामी सरकार-संभाजी पाटील निलंगेकर
- राज्य सरकार डॉक्टरांचा सल्ला घेतंय की कंपाऊंडरचा ? फडणवीस कडाडले
- माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची ‘बैलगाडी’ रोखली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
