Share

‘मुख्यमंत्री लोकलला ‘नाही’ म्हणाले नाही पण ..’,राजेश टोपेंनी दिले स्पष्टीकरण

Published On: 

मुंबई: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना आणि झिका व्हायरस संबंधी पत्रकार परिषद घेतली. राज्यात सोमवारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी नवीन निर्बंधाचे आदेश जारी केले. मात्र,यामध्ये लोकल, मंदिरे याबाबत निर्बंध शिथिल न केल्यामुळे नागरिकांकडून तसेच अनेक नेत्यांकडून नाराजी जाहीर करण्यात आली. यावर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. सोशल डिस्टन्सिंग, मास्क बंधनकारक आहे. लोकलसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ‘नाही’ असा शब्द उच्चारलेला नाही. असे ते म्हणाले आहे.

लोकल सुरु केल्यास काय परिणाम होतील. कोरोनाचा संसर्ग वाढल्यास त्यावर नियंत्रण ठेवता येईल का? लसीकरण झालेल्यांना प्रवासाची मुभा द्यायची मागणीही होत आहे. मात्र तसे करायचं म्हटल तर लसीकरण झाले आहे हे तपासण्याची व्यवस्था इतक्या मोठ्या प्रमाणावर कशी शक्य आहे. मुख्यमंत्री लोकलबाबत लवकरच निर्णय घेतील असे विधान राजेश टोपे यांनी केले आहे.

दरम्यान राज्यातील मंदिरे तूर्तास तरी बंद राहतील. यासाठी थोडा धीर धरण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान आता राज्यात कोरोनानंतर झिका व्हायरस विषाणूचा एक रुग्ण आढळून आला आहे.त्यामुळे आता याचे नवे संकट उभारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी अधिकची खबरदारी घेतली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!