मुंबई : राज्यात कोरोना रुग्ण संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. राज्य सरकारच्या वतीने ‘ब्रेक द चेन’च्या नव्या नियमावलीनुसार अनेक घडामोडी बंद करण्यात आल्या आहेत. त्यात राज्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारापेठाही बंद आहेत. मात्र, असे असतानाही रुग्ण संख्येत म्हणावी तशी घट झालेली नाही. त्यामुळे राज्य मंत्रीमंडळाने आणखी कडक लॉकडाऊन लावण्याची शिफारस केली होती. तसा निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील असेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी कोणतीच नवी नियमावली जाहीर केली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे जनतेला सामोरे जाण्याचे धाडसच झाले नसल्याचे प्रतिक्रीया भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिली आहे.
या संदर्भात भातखळकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘मंत्रिमंडळाच्या बैठकी नंतर मुख्यमंत्री आज निर्णय जाहीर करतील असे काल मंत्र्यांनी मीडिया समोर सांगितले होते. परंतु मुख्यमंत्र्यांना आज जनतेला सामोरे जाण्याचे धाडसच झाले नाहीसे दिसते.’
मंत्रिमंडळाच्या बैठकी नंतर मुख्यमंत्री आज निर्णय जाहीर करतील असे काल मंत्र्यांनी मीडिया समोर सांगितले होते. परंतु मुख्यमंत्र्यांना आज जनतेला सामोरे जाण्याचे धाडसच झाले नाहीसे दिसते.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 21, 2021
कोरोना रुग्णांना उपचार देण्यात, राज्यातील आरोग्य यंत्रणा सांभाळण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपयशी ठरले असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. तसे राज्यांनाच अधिकार असल्याचे मोदी म्हणाले होते. मात्र, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन बाबत कोणतेही भाष्य केले नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नगरला येणारा ऑक्सिजन टँकर पुण्यात अडवला, वेगळ्या भाषेचा उपयोग केल्यानंतर सोडला – थोरात
- चर्चा तर होणारच…! चेन्नई सुपर किंग्जच्या मराठमोळ्या पठ्ठ्याची धडाकेबाज अर्धशतकी खेळी !
- संचारबंदीत नाथ घाट परिसरात फटफटी गँगचा धुमाकूळ!
- कोरोनामुळे झालेले मृत्यू म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाने केलेली हत्या- खासदार जलील
- सुनेच्या खून प्रकरणी सासू-सासऱ्याला तीन महिन्यानंतर अटक


