अहमदनगर : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने थींमन घातले आहे. रोज रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत. यासोबतच, बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, रेमडेसिवीर यांचा मोठा तुटवडा जाणवत असून कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. केंद्राने ऑक्सिजन पुरवठासाठी अधिक मदतीचा हात दिला असून ती मदत पोहोचेपर्यंत राज्यातील स्थिती अधिक गंभीर होत आहे.
अनेक रुग्णालयांमधला ऑक्सिजनचा साठा संपत असल्याने रुग्णांना ऐनवेळी दुसऱ्या रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. तसेच, अनेक रुग्णालयांनी नव्या रुग्णांची भरती बंद केल्याने रुग्णांना आपला प्राण सोडावा लागत आहे. अशातच, अहमदनगर जिल्ह्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
अहमदनगरमध्ये ऑक्सिजनअभावी मंगळवारी रात्री अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आला होता. या रुग्णांसाठी तातडीने ऑक्सिजनचा एक टँकर बोलावण्यात आला होता. मात्र, टँकर रात्री पुण्याच्या हद्दीत अडवण्यात आला होता. यामुळे स्थिती गंभीर बनली होती. अखेर राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी याप्रकरणात मध्यस्थी केली व वेळेवर ऑक्सिजन टँकर नगरमध्ये दाखल झाल्याने अनेक रुग्णांचा प्राण बचावला आहे.
याबाबत बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली आहे. ‘कालची रात्र आमच्यासाठी भयानक होती. ऑक्सिजनचा हा टँकर वेळेत दाखल झाला नसता तर किती रुग्णांचे मृत्यू झाले असते, हे सांगता येऊ शकत नाही. नगरकडे येणारा हा ऑक्सिजन टँकर पुण्यात थांबवण्यात आला होता. हे समजताच मी फोन करून वेगळ्या भाषेत समज दिल्यानंतर हा टँकर सोडण्यात आला,’ अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना ही किरकोळ घटना वाटते; आरोग्यमंत्री इतका संवेदनहीन असू शकतो?’
- ४५ वर्षांनी देशाचा गरीब श्रेणीत पुन्हा समावेश, मोदींनी करून दाखवलं; काँग्रेसची टीका
- कोरोनाच्या लढ्यात भाजपकडून राजकारणाला महत्त्व-प्रकाश आंबेडकर
- ‘चीनला पूर्व लडाखमधून सैन्य मागे घ्यावेच लागेल’, भारताने सुनावले
- कडक लॉकडाऊनमध्ये जिल्हाबंदी नसेल पण…; आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती


